Mumbai-Nagpur Samriddhi Highway Accident Esakal
महाराष्ट्र बातम्या

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं अन्... दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू, तर ३ जण गंभीर जखमी

Samruddhi Mahamarg Accident: चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गाडीतील सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगरच्या करवड गावचे रहिवासी होते.

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते

गुरुवारी सकाळी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये गाडीतील २ जण जागीच ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले.

दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील साईड बॅरियरला तोडून गाडी उलटली आणि त्यामुळे भीषण अपघात झाला.

समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ स्कॉर्पिओचा अपघात झाला. ही स्कॉर्पिओ गाडी छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे येत होती. त्यामधील सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगरच्या करवड गावचे रहिवासी होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावर सातत्याने अपघता होत आहेत. ज्यामध्ये अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.

अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या महितीनुसार, बाजीराव एकनाथ गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. तर निशा रामकिसन गडगूळ (वय-२०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये वाहन चालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ, मिनाबाई रामकिसन गडगूळ, रामकिसन गडगूळ जखमी आहेत.

अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करत अपघातग्रस्त वाहन देखील रस्त्यातून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.

सहा. पोलिस निरीक्षक - समाधान पाटील पोलिस उपनिरीक्षक - दत्तात्रय चव्हाणके सहा पोलिस उपनिरीक्षक - त्र्यंबक कडाळे पोलिस नाईक - प्रविण गुंजाळ पोलिस कॉन्स्टेबल - त्र्यंबक देशमुख महाराष्ट्र सुरक्षा पथकातील सुरक्षारक्षक मनोज कोटकर , पद्माकर चव्हाण अपघातग्रस्त वाहनातील रुग्णांना मदत कार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT