uday samant Latest News uday samant Latest News
महाराष्ट्र बातम्या

Uday Samant : कात्रज चौकात होणार उदय सामंत यांची सभा, जाहीर सत्कार

सभेचा दिवस व वेळ अजून निश्चित झालेली नाही

सकाळ डिजिटल टीम

Uday Samant sabha पुणे : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांतील शाब्दिक चकमकीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. अशात तीन ऑगस्टला रात्री बंडखोर नेते व आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर कात्रज (Katraj Chowk) येथे जमावाने हल्ला केला होता. जमलेल्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला करून काचा फोडल्या होत्या. आता त्याच कात्रज चौकात उदय सामंत यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

कात्रज येथे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर चौकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मार्गस्थ झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा ताफा शंकर महाराज मठाकडे गेला. यावेळी उदय सामंत यांची गाडी कात्रज चौकात (Katraj Chowk) सिग्नलमुळे थांबली. सामंत यांना गाडीत पाहताच जमावाने ‘गद्दार गद्दार’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

यानंतर जमावाने उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न गाडीवर हाताने, चपलांनी मारण्यास सुरुवात केली. हाताच्या जोरदार ठोशांमुळे सामंत यांच्या गाडीची काच फुटली. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखून सौम्य लाठीमार करून जमावाला बाजूला केले.

तसेच उदय सामंत यांची वाट मोकळी करून दिली. यानंतर भरती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच कात्रज चौकात उदय सामंत यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती नाना भानगिरे यांनी दिली आहे.

तानाजी सावंत, किरण साली, नाना भानगिरे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सभेचा दिवस व वेळ अजून निश्चित झालेली नाही. तसेच सामंत यांची चार ठिकाणी सभा होणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT