Udayanraje Bhosale vs Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

राजघराण्यावर बोलताना लाज राखा, मागं हाच छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागत होता; उदयनराजेंनी सुनावलं

छत्रपतींचं येथील वंशज सध्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर नाही.

सकाळ डिजिटल टीम

'सत्तेत राहण्यासाठी विकृत लोक काहीही बडबडतात आणि समाजात क्लेष निर्माण करण्याचं काम करतात. त्यांचा हेतू काय हे मला माहिती नाही.'

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यासारखी (Ajinkyatara Fort) सध्या शिवसेनेची (Shiv Sena) अवस्था झाली असून, या किल्ल्यानं अनेक घाव झेलले आहेत. छत्रपतींचं येथील वंशज सध्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) अजिबात आदर नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राजघराण्यावर बोललं होतं.

दरम्यान, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे थेट तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर दिलंय. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ते बरळत आहेत. त्यांचं हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थाचे विधान आहे. प्रत्येकवेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळं तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा टोला उदयनराजेंनी राऊतांना लगावला.

'सत्तेत राहण्यासाठी विकृत लोक काहीही बडबडतात'

काल (शुक्रवार) साताऱ्यात संजय राऊतांनी (Sanjay Raut) पक्षाच्या मेळाव्यात छत्रपतींच्या घराण्यावर टीका केली होती. या टीकेला आज उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलंय. 'सत्तेत राहण्यासाठी विकृत लोक काहीही बडबडतात आणि समाजात क्लेष निर्माण करण्याचं काम करतात. त्यांचा हेतू काय हे मला माहिती नाही. ही लोक व्यक्ती केंद्रीत आहेत. त्यांनी विधान करताना मोजून, मापून, समजून विधान केलं पाहिजे.'

'दुसऱ्यावर शिंतोडे उडवून तुम्ही फार मोठे होत नाही'

त्यांना (राऊत) मी ओळखत नाही आणि महत्वही देत नाही. लोकशाहीत लोकांचा सहभाग व्हावा ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी मांडली. त्यांनी ही मांडणी केली नसती तर आजही राजेशाही असती. लोकशाहीच्या धर्तीवर आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. मागे हाच आम्ही छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागत होता. राजकारण करा आणखी काही करा, प्रत्येकानं आपला पक्ष वाढावा म्हणून प्रयत्न करायला हवेत. पण, दुसऱ्यावर शिंतोडे उडवून तुम्ही फार मोठे होत नाही. प्रत्येकवेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. त्यामुळं घराण्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा टोला उदयनराजेंनी राऊतांना लगावला. आता राऊत उदयनराजेंच्या टीकेला काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले होते राऊत?

छत्रपतींचे वंशज आज ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर नाही. साताऱ्याचे प्रतापसिंह महाराज कधी झुकले नाहीत; पण त्यांच्या वंशजांनी भाजपशी तडजोडी केली, असं राऊत म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT