PM Narendra Modi Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: PM मोदींसमोर उद्धव ठाकरेंनी ती चुक केली होती कबूल; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे म्हणाले होते, मी चुकलो

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल आहे. अशातच राज्यातील सरकार पडलं याला सर्वस्वी उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याची टीका शिंदे गटातील मंत्र्यांनी केली आहे. तर आजच्या खेडमधील सभेच्या आधी मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो ही चूक झाली. मुंबईत गेल्यावर चूक दुरुस्त करतो, अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय. दीपक केसरकर यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीतील खेडमधील सभेपूर्वीच दीपक केसरकर यांनी हा दावा केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची आघाडी तोडा हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत होतो. आम्ही फसवलं नाही. तुम्हीच आम्हाला सांगितलं, तुम्ही निघून जा. आणि आता जनतेला खोटं सांगत आहात. खोटं तरी बोलू नका. तुम्ही स्वत: पंतप्रधानांसमोर कबुल केलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याची तुमच्याकडून चूक झाली. हिंदुत्वाचा विचार सोडण्याची चूक झाली आहे असं यावेळी केसरकर म्हणाले आहेत.

तर पुढे केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्याबरोबर मी चूक दुरुस्त करेन, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी देऊन दिल्लीतून परत आले. पण इथं आल्यावर तुम्ही शब्द मोडलेला असेल तर कोणी कुणाला फसवलं हे राज्यातील जनतेला समजलं पाहिजे, असा खळबळजनक गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे.

तर "मी हे घडवू शकलो केवळ देवाची कृपा आहे. पण त्याचा फायदा ठाकरेांना घेता आला नाही. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फसवलं. तुम्हाला फसवलं त्याचा दोष दुसऱ्यावर का टाकता? आम्ही राज्यासाठी जे काम करत आहोत, त्याला आशीर्वाद दिला असता तर चांगलं झालं असंत, असा हल्लाबोल केसरकर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Stampede Police Clarification: शिवनेरीवर चेंगराचेंगरी झालीच नाही, खुद्द जिल्हा पोलिस प्रमुख संदीप गिल यांनी व्हिडिओद्वारे दिली माहिती

Beautiful Women : भारताशेजारीच राहतो असा समुदाय जिथे लोक 150 वर्षांपर्यंत राहतात जिवंत; 80 वर्षांच्या महिलासुद्धा दिसतात तरुण

Automation & AI Threat to Jobs : पुढील 10 वर्षांत गायब होऊ शकतात 'या' 6 नोकऱ्या; पाहा तुमची नोकरी यादीत आहे का?

तो हत्यारा... माझ्याकडे Video पुरावे आहेत! पाकिस्तानी क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप; वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकड्याचा 'कांड' उघड

Latest Marathi News Live Update : प्राध्यापिका नेहा सिंग यांना कोणतेही तांत्रिक ज्ञान नव्हते- कुलसचिवांची माहिती

SCROLL FOR NEXT