महाराष्ट्र बातम्या

...तो आक्रोश मोर्चा सत्तेसाठी होता; मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता फडणवीसांना टोला

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : मागे कुणीतरी औरंगाबादमध्ये आक्रोश मोर्चा काढला होता. तो आक्रोश मोर्चा नव्हताच. सत्ता गेली म्हणून काढलेला आक्रोश मोर्चा होता. आमच्या पूर्वी तुमचीच सत्ता होती. मग का नाही सोडवला पाण्याचा प्रश्न, असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्ला चढवला. (Uddhav Thackeray attack on Devendra Fadnavis)

संभाजीनगरात पाण्याचा (water) प्रश्न गंभीर आहे. पाच पाच ते दहा दहा दिवसांनी येथील नागरिकांना पाणी मिळत होते. मात्र, आता हे अंतर हळूहळू कमी होत आहे. येथील पाण्याचा प्रश्न सुटत आहे. संभाजीनगरात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना मी पाठ फिरवणार नाही, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

मी येथील अधिकाऱ्यांना पाण्याचा प्रश्न सोडवण्यास सांगितले आहे. येथील लोकांना ठेकेदारांना दंडा घेऊन सरळ करण्यास सांगितले आहे. झारीतील शुक्राचार्याला बाहेर काढण्यास सांगितले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

समांतर जलवाहिनीचे मी भूमिपूजन केले होते. येथील पाणीप्रश्न मी सोडवणार आहे. स्टीलच्या किमती वाढल्या आहेत. समांतर योजनेसाठी पैसे कमी पडत आहे. म्हणून मंत्रिमंडळातून पैसे देण्याची व्यवस्था केली आहे. पाणी प्रश्न लवकर सोडवणार, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ready Reckoner Rates Unchanged : घर, जमीन घेणे महाग होणार नाही; रेडीरेकनर दर ‘जैसे थे’च, राज्य सरकारचा निर्णय

Parbhani News: शेणखताची ट्रॉली झाली साडेतीन हजाराला!; पशुधन घटल्याने दरात वाढ; खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

Pune News: पालखी सोहळ्याचा पुणे मुक्कामाचा निर्णय समन्वयातून घेणार: ॲड. राजेंद्र उमाप, १३ एप्रिलला अंतिम निर्णय आळंदीत घेतला जाईल!

मराठी इंडी म्युझिकला नवा मानाचा मुजरा! २ एप्रिलला रंगणार 'मिमा २०२६’चा सोहळा

Latest Marathi News Live Update : १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला विदर्भात तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT