Ashish shelar sakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांना पालापाचोळा म्हणणं महाराष्ट्राचा अपमान - आशिष शेलार

सडलेला पालापाचोळा झडून गेला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर टीका केली होती.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतरची ही पहिलीच जाहीर मुलाखत आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाल्यावर त्यावर अनेक नेत्यांकडून टीका केली जात आहे. मुख्यमंत्र्यांना पालापाचोळा म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं भाजपा नेते आशिष शेलारांनी म्हटलं आहे. (Ashish Shelar on Uddhav thackeray interview)

भाजपा नेते आशिष शेलारांनी (Ashish Shelar) म्हटलं की, ज्यावेळी मुख्यमंत्री व्हायचं होतं, तेव्हाही भाजपाला इशारे देण्यात आले. मग मुख्यमंत्री पदावर बसले, तेव्हाही भाजपाला इशारे दिले आणि आता पायउतार व्हावं लागलंय, तेव्हाही भाजपाला इशारे दिले. इशारे आणि टोमणे मारल्यानंतर आपल्याला महत्त्व मिळेल यातून हे सगळं सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना शेलार म्हणाले की, राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना जर कोणी पालापाचोळा म्हणत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आता महाराष्ट्र द्रोह होत नाही का, हा राज्याचा अपमान नाही का?

आजारपणात सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याच्या उद्धव ठाकरेंच्या आरोपावरही आशिष शेलारांनी भाष्य केलं आहे. शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंना सहानुभूत हवीये म्हणून ते असं बोलतायत. तुमची सत्तेची लालसा एवढी होती की, आजारी असताना एका दिवसासाठी सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कुणाला दिला नाही. आजारपणातही ममता बॅनर्जी यांना भेटत होते, शरद पवारांसोबत बैठका सुरू होत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT