Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : शिवसेना, धनुष्यबाणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर...

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह या संदर्भात आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे.

धनश्री ओतारी

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं या संदर्भात आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, शिवसेना, धनुष्यबाणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. (Uddhav Thackeray Election Commission Shiv Sena sign Eknath Shinde group maharashtra politics )

आज होणाऱ्या सुनावणीत निवडणूक आयोग या संदर्भात निर्णय देऊ शकतो. आयोगाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ठाकरे गटाचा प्लान तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Politics : शिंदेकडे संख्याबळ पण कंट्रोल ठाकरेंकडे; शिवसेना कोणाची होणार?

काय आहे ठाकरे गटाची तयारी?

केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला तर ठाकरे गट जनतेत जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे गट जनतेतून पक्षाचं चिन्हं आणि नाव मागवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी करत आहे, अशीदेखील माहिती समोर आली आहे.

आमदार-खासदारांच्या संख्येनुसार निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सादिक अली खटल्यानुसार निकाल लागला तर शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मेघगर्जनेसह उष्णतेचा इशारा! राज्यातील 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; हवामान विभागाचा अलर्ट

IND A vs AFG A: वैभव सूर्यवंशीला फायनलमध्ये टार्गेट करणार? श्रीलंकेच्या कर्णधाराने दिलं स्पष्ट उत्तर, 'आमचे खेळाडू कोणालाही...'

EPFO Interest Rate 2026: 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! व्याजदराच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी; खात्यात पैसे कधी जमा होणार?

Claude AI काय आहे? जबरदस्त फीचर्स, कमाल फायदे; तुमच्या रोजच्या कामांना बनवेल एकदम सोपं, मित्रासारखी करेल मदत

Latest Marathi Live Updates: नागपुरातील विद्यार्थ्याला बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

SCROLL FOR NEXT