Shambhuraj Desai vs Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena News : शंभूराज देसाईंनी मंत्रीपदासाठी बुध्दी गहाण ठेवलीये का? ठाकरे गटाच्या नेत्याचा संतप्त सवाल

'संजय राऊत यांच्या जीविताला धोका झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची?'

रुपेश कदम

Shambhuraj Desai News:मंत्री शंभूराज देसाई यांनी वृत्तवाहिनींवरती बेजबाबदारपणे बोलणं हे त्यांच्या शिक्षण, पद व घराण्याच्या सुंस्कृतपणाला काडीचं देखील शोभत नाही.

दहिवडी (सातारा) : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिली असल्याचं पत्र खुद्द संजय राऊत यांनी मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त यांना दिलं आहे.

यामध्ये ठाण्याचा गुंड राजा ठाकूरचे नाव घेतलं असून संजय राऊत हे सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक व जबाबदार व्यक्ती आहेत.

त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असताना शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची वक्तव्य पाहता त्यांनी मंत्रीपदासाठी आपली बुध्दी गहाण ठेवलीये का? असा सवाल शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी उपस्थित केलाय.

संजय भोसले (Sanjay Bhosale) यांनी पत्रकात म्हटलंय, 'मंत्री शंभूराज देसाई यांनी वृत्तवाहिनींवरती बेजबाबदारपणे बोलणं हे त्यांच्या शिक्षण, पद व घराण्याच्या सुंस्कृतपणाला काडीचं देखील शोभत नाही. संरक्षण व पुन्हा डामडौल मिळावा म्हणून हा केविलवाणा प्रयत्न संजय राऊत करत असल्याचं वक्तव्य जबाबदार मंत्र्यानं करणं उचित नाही.'

मंत्रीपद कायम रहावं म्हणून शंभूराजेंची देखील कायम वायफळ बडबड, धडपड व मीडियासमोरील पोपटपंचीपणा जनतेत लपून राहिलेला नाही, असा सणसणीत टोला जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी मारला.

फुटीर आमदारांचं केंद्रात आणि राज्यात सरकार असताना त्यांना नक्की कोणाची भीती वाटतेय म्हणून मागं पुढं पोलीस गाडीचं संरक्षण घेऊन त्यांना फिरावं लागत आहे, असा प्रतिप्रश्न भोसलेंनी मंत्री शंभूराजेंना विचारला आहे. तसंच जर संजय राऊत यांच्या जीविताला धोका झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT