Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: भागवतांनी कार्यलायत बघावं कुठे लिंबू टाकला आहे का? उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला

सकाळ डिजिटल टीम

Eशिंदेंची वृत्ती घाणेरडी आहे. आरएसएसनंही काळजी घ्यावी. भागवतांनी कार्यलायत बघावं कुठे लिंबू ठाकलां आहे का? अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज नागपुरातील (Nagpur) रेशीमबाग इथल्या डॉ. हेडगेवार स्मृतीभवन इथे आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr K B Hedgewar) यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. यावरुन ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिंदेंची वृत्ती घाणेरडी आहे. आरएसएसनंही काळजी घ्यावी. त्यांनी आता सावध रहावं. भागवतांनी कार्यलायत बघावं कुठे लिंबू टाचण्या पडल्यात का? तसेच, शिंदे आरएसएसच्या मुख्यालयाचा ताबा घेण्यासाठी गेले होते का? असा सवाल उपस्थित केला.

तसेच, सहा महिन्यांत राज्य सरकारने काय केलं? संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही काय देणार? 52000 कोटी तुम्ही कसे वापरणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. विदर्भाला काय देणार याचे उत्तर अजून आले नाही. उद्योग इतर राज्यात गेले, तर तरुणांना रोजगार संधी कशी मिळणार याचे उत्तर अजून आले नाही.

हिवाळी अधिवेशन असूनही सत्ताधार्‍यांना विरोधकांनी घाम फोडला. मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपातील गांभीर्य पाहता मंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवे. आरोप झाल्यावर ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना क्लिनचिट द्यायची अशी काही योजना आहे का? असा प्रश्नांचा भडिमार उद्धव ठाकरेंना केला.

सरकारला युवा शक्तीची ताकद अजून कळली नाही. मुंबई केंद्रशाशित करा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलत आहेत ते कुणाच्या पक्षाचे आहेत. भाजपचा हा डाव आहे ते आता पोटातून ओठावर आलयं.

मुंबई भाजपच्या ताब्यात गेली तर घात कसा करणार हे समोर आलं. मुंबई कुणाच्या हाती सुरक्षित हे मुंबईकरांना माहित आहे.असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT