Uddhav Thackeray Resignation Updates  Sakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा आनंद नाही, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

'आम्हाला आनंद होत नाही? आम्ही हळूहळू लांब गेलो'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जाण्यापूर्वी वर्षावर भेटून गेलो होतो. आम्ही त्यांच्या विरोधात आहे का? आम्हाला आनंद होत नाही? आम्ही हळूहळू लांब गेलो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनाम्या दिल्यानंतर केसरकर माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे लोक जवळचे झाले. मुख्यमंत्रीपदामुळे कामे वाढली होती. मी एकट्याची भूमिका मांडत नाही. आम्हाला बिलकूल आनंद होत नाही. सगळ्यांशी चर्चा करुन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे केसरकर म्हणाले. (Uddhav Thackeray Resignation Rebel Eknath Shinde Faction Reaction)

आम्ही अडीच वर्षांपूर्वी औरंगाबादचे नामांतर करु शकलो नाही. आमच्या बंडानंतर नामांतरची घोषणा झाली, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने खूशी नाही. आम्ही गुलाल, ना पेढे वाटलेले नाही. आमच्या नेत्याला आमच्यापासून, विचारापासून लांब नेले आहे, असा आरोप दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला. (Maharashtra Politics)

नामांतर दबावामुळे झाले आहे. सर्व घडामोडींना संजय राऊत जबाबदार आहेत. सकाळी नऊ वाजता उठून राऊत मोदींविषयी वक्तव्य करायचे? कशाला असे करायचे? संजय राऊत हे ५० टक्के राष्ट्रवादीचे, ५० टक्के शिवसेनेचे आहेत. कशाचा अंत.. दगाबाजी कोणी केली. राऊतांनीच केली, असा हल्लाबोल त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Pickleball Championship 2026: महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कोचीमध्ये वर्चस्व! सर्व श्रेणींमध्ये मिळवले संघ अजिंक्यपद!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 सप्टेंबर 2026

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT