Uddhav Thackerays Latest News Uddhav Thackerays Latest News
महाराष्ट्र बातम्या

Uddhav thackeray : उद्धव ठाकरेंचे एका बाणात दोन पक्षी! जळगावमध्ये म्हणाले...

आपल्याला नवे गुलाब फुलवायचे आहे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : Uddhav thackeray In Jalgaon आमदारांनी बंड पुकारल्याचा घटनेला दीड महिना झाला आहे. अनेक आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिंदे गटात जणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. पक्षांतर करताना उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाही केला जात आहे. रळूरळू दुःख व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे भाजपकडून शिवसेना संपत चालले असल्याचे बोलले जात आहे. या सर्वांचा समाचार आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. ३) जळगावमध्ये शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदार माजी मंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शपथपत्राचे व प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे घेऊन जळगावमधील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीला भेट दिली होती.

आज जळगावमधील शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्‍यावर हल्ला केला. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav thackeray) नाव न घेता टोला लगावला. आपल्याला नवे गुलाब फुलवायचे आहे, असे म्हणत जळगावमधील कार्यकर्त्यांना नवीन उमीद दिली.

शिवसेना (Shiv sena) फोडण्याचे आजपर्यंत अनेकवेळा प्रयत्न झाले. परंतु, यावेळी शिवसेनेला संपविण्याचा कट रचला गेला. अशी कित्येक आव्हाने पायदळी तुडवत भगवा फडकवला आहे, अस म्हणत त्यांनी जे. पी. नड्डा (J P Nadda) यांना उत्तर दिले. तीन दिवसांपूर्वी नड्डा यांनी शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे, असे विधान केले होते. भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT