Uddhav Thackeray Replied to Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Uddhav Thackeray Replied to Devendra Fadnavis | उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांच्या टीकेवर भाष्य केलं.

Shubham Banubakode

Uddhav Thackeray responds to Devendra Fadnavis Rudali comment during Marathi language victory rally : मराठी भाषा विजय मेळाव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे रुदाली असल्याची त्यांनी म्हटलं होतं. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मराठी माणसाचा आनंद जर त्यांना रुदाली वाटत असेल तर हिणकस प्रवृत्ती आहे, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांच्या टीकेवर भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

भाजपाची मानसिकता आम्ही समजू शकतो. खरं तर मुळ भाजपा मेलेली आहे. त्यानंतर आता त्यांची रुदाली सुरु आहे. त्याच्याकडे उर बडवायला माणसं नाहीत. त्यासाठी त्यांनी आमच्या आमच्या पक्षातले उरबडवे घेतले आहेत. त्यांनी भाजपा हा पक्ष मारून टाकल्याने त्यांना उरबडवायला दुसऱ्या पक्षातून माणसं घ्यावी लागत आहेत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

''ही माणसं हिणकस वृत्तीची''

मराठी माणसाच्या आनंदाला जर फडणवीस रुदाली म्हणत असतील तर ही विकृती आहे. ही माणसं हिणकस वृत्तीची आहेत, असं प्रत्युत्तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं. तसेच आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपाच्या बुडाला आग लागली आहे. ते त्यांना दाखवता येत नाही आणि शमवताही येत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

आशिष शेलारांना दिलं प्रत्युत्तर...

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलार यांनाही प्रत्युत्तर दिलं. भाजपाने मराठी माणसाची तुलना त्यांनी पहलगाममधील दहशतवाद्यांशी केली आहे. हेच लोक खरे मराठीचे शत्रू आहेत. अशी तुलना करताना त्यांना लाजही वाटत नाही. भाजपा मराठीचे खरे मारेकरी आहे, असं त्यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?

दरम्यान, मराठी भाषा विजय मेळाव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे रुदाली असल्याची त्यांनी म्हटलं होतं. ''मला असं सांगण्यात आलं होतं, की आज मराठीचा विजयी मेळावा आहे. पण त्याठिकाणी रुदालींचं भाषणही झालं. त्यांनी मराठीबाबत एक शब्द न बोलताना आमचं सरकार पाडलं, आमचा पक्ष फोडला, हे रडगाणं सुरू केलं. त्यामुळे हा मराठीचा विजय नव्हता, तर रुदाली रडणं होतं. या रुदालीचं दर्शन या ठिकाणी झालं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपायुक्तच बनल्या मालकीणबाई? मसाज, भांडीकुंडी अन् धमक्या… व्हिडिओ व्हायरल! सफाई कामगार महिलेचे धक्कादायक आरोप

समलैंगिक संबंध, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; CAची आत्महत्या; 22 वर्षीय तरुणीसह दोघांना अटक

शिक्षक मुंबईत! 'आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे हाल; शाळा बंदच्या निर्णयावर ठाम'; राज्य सरकारकडून निघाला नाही तोडगा

मंदिराचा पदाधिकारी चर्चमध्ये प्रार्थनेला जायचा; तिरुपती देवस्थानने केली मोठी कारवाई

PMC Development : रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार; कृती पथकाची निर्मिती; कोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT