Tejas Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

उद्धव काढणार 'हुकमी एक्का'; तेजस ठाकरे घेणार आदित्य यांची जागा?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत निम्म्याहून अधिक शिवसेना आमदार आपल्यासोबत घेऊन भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. शिवाय मुख्यमंत्री देखील झाले. या धक्क्यातून सावरत असलेल्या शिवसेनेला शिंदे गटाकडून अजुनही धक्क्यावर धक्के देण्यात येत आहेत. शिवसेनेचे खासदारही आपल्याकडे वळविण्यात शिंदे यांना यश आलं आहे. त्यामुळे शिवसेना पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख आपला हुकमी एक्का काढण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. (Tejas Thackeray news in Marathi)

उद्धव यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे लवकरच राजकारणाचे मैदान गाजविण्यासाठी सज्ज होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव यांच्यानंतर आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय झाले. आदित्य यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी आहे. मात्र शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आदित्य ठाकरे यांच्यावरची जबाबदारी वाढली असून आदित्य यांनी देखील जबाबदारीचा शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिवसेना सावरण्याच्या प्रयत्नात आदित्य यांना तेजस ठाकरे यांची साथ मिळण्याची शक्यता आहे.

तेजस ठाकरे यांना आपले वडील उद्धव यांच्याप्रमाणेच फोटोग्राफीची आवड आहे. मात्र ते वाईल्डलाईफ फोटोग्राफी करतात. त्यांनी दुर्मिळ सापाची आणि खोकड्याची दुर्मिळ प्रजाती शोधून काढली. मात्र शिवसेनेवर आज जी स्थिती ओढावली आहे, त्या स्थितीतून पक्षाला बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना खडतर परिश्रम करावे लागणार आहे. अजुनही किती नेते सोबत आहेत, याची शाश्वती नाही आहे. अशा स्थितीत उद्धव यांच्यासाठी तेजस ठाकरे हुकमी एक्का ठरतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

तेजस ठाकरे यांची नियुक्ती युवासेना अध्यक्षपदाची करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर शिवसेना पक्षप्रमुखपद हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जेणेकरून शिवसेनेतील महत्त्वपूर्ण निर्णय घेणे आदित्य यांना शक्य होईल.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी उद्धव ठाकरे राजभवनावर जात असताना उद्धव ठाकरे यांच्या बाजुच्या सीटवर तेजस ठाकरे बसलेले होते. तेव्हापासूनच तेजस राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र तेजस यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असं शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं. ते राजकारणात आल्यास फारसं आश्चर्य वाटण्याचं कारण नसल्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.

अलिकडेच तेजस यांचा २६ वा वाढदिवस साजरा झाला. त्या निमित्ताने सामनामध्ये एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात तेजस यांना ठाकरे कुटुंबाचे विवियन रिचर्ड्स असं नाव दिलं होतं. आता तेजस डबघाईला आलेले शिवसेनेसाठी विवियन रिचर्ड्स ठरतात का हे येणारा काळच सांगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जाताना BMW कोस्टल रोडवरून कोसळली; तिघांचा मृत्यू, पोलिस काय म्हणाले?

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT