Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : 'मला काही हुडी, गॉगल घालून...'; ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतून टोमणा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या हलचालींना वेग आला आहे.

रोहित कणसे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या हलचालींना वेग आला आहे. इंडिया आघाडीत सहभागी पक्षांमध्ये जागावाटप आणि समन्वयक इत्यादी मुद्द्यावर चर्चेसाठी आज दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठक बोलवली आह. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहाणार आहेत.

दरम्यान मी बऱ्याच दिवसांनी दिल्ली आलोय, इंडिया आघाडीची बैठक होत असून अनेक मुद्यांवर आज चर्चा होईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले.

उद्धव ठाकेरेंना दिल्ली दौऱ्यात कोणा-कोणाला भेटणार असा प्रश्न विचारण्यात आला होता, याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मी भेटीगाठी सुरू करेल आणि संध्याकाळी कोणा- कोणाला भेटेल ते मी तुम्हाला सांगेल. मी जरी थंडीमुळे जॅकेट घातलं असेल तरी, हुडी, गॉगल घालून भेटायची काही गरज नाहीये. मी जे करतो ते खुले आम करतो असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून जे सत्तांतर झालं त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे रात्री वेश बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायला जात होते. हुडी आणि गॉगल घालून ते भेटायला जात होते. त्यांचं हे वेशांतर पाहून मीही त्यांना ओळखत नव्हते, असा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला होता. याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतून फडणवीसांना टोला लगावला.

दरम्यान शरद पवार हे इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून कसे वाटतात? या प्रश्नावर माझी मते मी बैठकीत सांगेल काहीही बोलून मी वाद निर्माण करू इच्छित नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी इंडिया आघाडीतील पक्ष आपचे नेते अरविंद केजरीवाल नाराज नाहीत, मी काल त्यांची भेट घेतली, हसत खेळत वातावरण होत. आजच्या बैठकीसाठी काय मुद्दे असावेत यावर चर्चा झाली, असंही ठाकरे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT