Union Health Minister Mansukh Mandaviya 
महाराष्ट्र बातम्या

एकीकडे ED आणि दुसरीकडे कौतुक, केंद्रीयमंत्र्यांनी केली कोरोना काळातील ठाकरेंच्या कामाची स्तुती, फडणवीसांची सारवासारव

Sandip Kapde

कोरोना काळात झालेल्या कामासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकार तत्कालीन ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. सत्ताधाऱ्यांनी ठाकरे परिवाराला देखील घेरले आहे. मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी उद्धव ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेते तोंडावार आपटले आहेत.

ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना काळात राज्यात चांगलं काम झाल्याचं सांगत कोरोना काळातील कामाचे कौतुक केलं आहे. त्यावेळी ठाकरे सरकार सत्तेत होते, हा प्रश्न उपस्थित करताच आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोना काळातील कामावर कुठल्याही प्रकारे मला राजकारण करायच नाही.

जर यामध्ये कुठलं चुकीचं काम झालं असेल तर या संदर्भात कारवाई व्हायला हवी, असे सुद्धा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख मांडवीया हे आयुष्यमान भारत योजनेत संदर्भात बोलत असल्याचे सांगत सारवासारव केली.

कोरोना काळात झालेल्या गैरप्रकारांची ईडीच्या वतीने चौकशी करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या लोकांच्या घरी ईडीचे अधिकारी कालपासून चौकशा करत आहेत. त्यातच आज ईडीचे अधिकारी भायखळ्यातील महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खाते विभाग कार्यालयात देखील गेले होते.

ईडी अधिकाऱ्यांच्या सोबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारीही सोबत असून कोविड घोटाळा प्रकरणाती ईडीचे धाडसत्र सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्याकडून पालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT