Sky Bus Nitin Gadkari Sakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari: गडकरींची उडणारी बस नुसतं आश्वासन नाही; मंत्रालय Action Mode मध्ये

वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नितीन गडकरींनी उडणाऱ्या बसचा पर्याय सुचवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातल्या महानगरांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उडणाऱ्या बसचा पर्याय सुचवला आहे. आता ही बस कधी येणार, त्याची अंमलबजावणी कशी होणार, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. त्याचसंदर्भात आता नितीन गडकरी यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. (Nitin Gadkari on Skybus in India)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या उडणाऱ्या बसबद्दल माहिती दिली आहे. एबीपी माझा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे. बंगळुरूमध्ये या स्कायबसचा अभ्यास सुरू असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ज्या शहरात रस्ते वाढवता येत नाहीत, जमिनीसंदर्भातल्या समस्या निर्माण होतात, अशा शहरांत या स्कायबसचा पर्याय चांगला ठरेल. अशाच पद्धतीची स्कायबस फिलिपिन्समध्ये सुरू आहे. भारतातही त्याच धर्तीवर स्कायबस सुरू करण्याचा विचार नितीन गडकरी यांनी मांडला आहे.

आयटीपार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये ही स्कायबस सुरू करण्याचा विचार असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या उपायाबद्दल विचार करण्यास सुरूवात केली आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाईल, तसंच तीन महिन्यांत त्यांचा अहवाल मिळणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. या अहवालानंतर या स्कायबसबाबत पुढचा विचार करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

Pimpri Metro: मेट्रोचा पादचारी पूल अद्याप अपूर्णच; मोरवाडी चौकात संथगतीने काम, धोका पत्करून रस्ता ओलांडण्याची वेळ

Tata Motors: टाटा मोटर्सचा शेअर 40 टक्क्यांनी घसरला; शेअर बाजारात नेमकं काय घडलं?

Kolhapur Youth Accident : आयुष्याचा शेवट एका स्पीड ब्रेकरमुळे झाला, २४ सत्यजित बाबतीत घडलं विपरीत

Nashik Crime : भद्रकाली पोलिसांची मोठी कारवाई! १८ गुन्हे दाखल असलेल्या तडीपार सागर कुमावतला वणी गडावरून घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT