JAYANT PATIL NARAYAN RANE 
महाराष्ट्र बातम्या

PM मोदींनी कसे नेते निवडलेत याची ही झलक; जयंत पाटलांचा टोला

कार्तिक पुजारी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. याप्रकरणी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कसे नेते निवडलेत, याची ही छोटीशी झलक नारायण राणेंनी (Narayan Rane) दाखवून दिली आहे. मोदी यांनी नवे मंत्री कोणत्या निकषावर निवडले आहेत हे तपासायला हवे. राजकारणाचा नाही पण काही लोकांचा स्तर खाली गेला आहे. अशा पद्धतीने बोलणाऱ्या व्यक्तींना महत्त्व देणे किती योग्य आहे याचाही प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करायला हवा, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. याप्रकरणी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. (Maharashtra Latest News)

राजकारणात कसं वावरायचं हे माहिती असायला हवं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत तुमचा द्वेष असेल. भारतीय जनता पक्षाच्या मनात मुख्यमंत्र्यांविषयी प्रचंड राग असेल, तरीही ही भाषा महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही. नारायण राणेंनी असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांचा निषेध व्यक्त करणं योग्य आहे, असं पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून संयमाने आणि जबाबदारीने वागले आहेत. पण, काहींनी टोकाची भूमिका घेतली असेल, शिवसेना नाही पण जनता आक्रमक होत आहे. गृहखातं याची काळजी घेईल. कायदा कोणी हाती घेत असेल तर राष्ट्रवादी पक्ष त्याचे समर्थन करणार नाही. पण, अशा खालच्या पातळीवरचं मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य करणं याचा निषेध करावा तेवढं थोडं आहे, असं ते म्हणाले.

नारायण राणेंचे विधान गंभीर आहे. यापूर्वी असं कोणी महाराष्ट्रात बोललं नव्हतं. त्या विधानाकडे पाहिल्यास महाराष्ट्रातील जनतेला अपमान झाल्यासारखं वाटत आहे. चंद्रकांत दादांना मनावर घेऊ नका. दोन वर्षांपासून ते हेच सांगत आहेत. त्यामुळे त्यांना किती महत्व द्यावं हे माध्यमांनी ठरवावं, असं म्हणत जयंत पाटील यांनी टोला लगावला. देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील नारायण राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करतात का? हे महाराष्ट्राच्या जनतेला कळणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT