Chief Election Officer Shrikant Deshpande, Latur Collector Prithviraj PB, Zilla Parishad CEO Abhinav Goyal
Chief Election Officer Shrikant Deshpande, Latur Collector Prithviraj PB, Zilla Parishad CEO Abhinav Goyal esakal
महाराष्ट्र

ठाव-ठिकाणा नसलेल्या पंधरा लाख मतदारांना डच्चू, डबल फोटोवाले रडारवर

विकास गाढवे

लातूर : मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले तसेच मतदान ओळखपत्र न दिलेले अनेक मतदार होते. या मतदारांचा शोध लागत नव्हता. ते पत्त्यावर आढळून येत नव्हते. आतापर्यंत अशा राज्यातील पंधरा लाखाहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत. अशा आणखी पाच ते सहा लाख मतदारांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यासोबत दोन मतदार आणि एक छायाचित्र असलेल्या वीस लाख मतदारांना वगळण्यासाठी कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी दिली. लातूर (Latur) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी (ता.२१) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Unknown Voters Name Dropped From Voters Lists, Said Chief Election Officer Shrikant Deshpande In Latur)

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसीलदार स्वप्निल पवार व नायब तहसीलदार एच. ए. काळे उपस्थित होते. देशपांडे म्हणाले, मतदार यादी शुद्ध करून ती सदृढ करण्यासाठी निवडणूक आयोगाने भक्कम पावले उचलली आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादी दोषरहित करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून ते संकलित केले. ठावठिकाणा न लागणाऱ्या मतदारांचा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) माध्यमातून शोध घेण्यात आला. त्यांना स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवल्या. अनेकांच्या नोटिसा परत आल्या. काही ठिकाणी पंचनामे करण्यात आले व सुनावण्या घेऊन अशा २१ लाखांपैकी १५ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत. उर्वरित अशा पाच ते सहा लाख मतदारांबाबत चार ते पाच महिन्यात निर्णय घेऊन ही संख्या शून्यावर आणण्याचे प्रयत्न आहेत. राहिलेले पाच ते सहा लाख मतदार हे मुंबई, पुणे, ठाणे आदी मोठ्या शहरांतील असून ते स्थलांत्तरीत असण्याची शक्यता आहे.

चाळीस लाख डबल फोटोवाले

अनेकांनी स्वतःची दोन ते तीनवेळा मतदार म्हणून नोंदणी केली आहे. नाव, वय व पत्ता आदी तपशीलात थोडा बदल करून नोंदणी केली तरी छायाचित्र एकच आहे. निवडणूक आयोगाने एकाच छायाचित्र असलेल्या एकाहून अधिक मतदारांचा शोध घेण्यासाठी फोटो सिमिलॅरीटी प्रणालीचा आधार घेतला आहे. प्रणालीतून राज्यात आतापर्यंत चाळीस लाखाहून अधिक मतदारांनी डबल धमाका केल्याचे पुढे आले आहे. प्रणाली तंतोतंत असल्याने शोध शक्य झाला. छाननीनंतरच्या प्राथमिक अंदाजानुसार यातील वीस लाख मतदार यादीतून वगळले जाऊ शकतात. मोहिम राबवून पाच महिन्यांत डबल फोटोवाल्या मतदारांची वगळणी करण्यात येऊन त्यांचीही संख्या शून्यावर आणण्यात येणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

लातूर प्रशासनाचे काम चांगले

या वेळी देशपांडे यांनी मतदार यादी शुद्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. लातूरचे काम चांगले असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. छायाचित्र नसलेल्या तसेच ठावठिकाणा लागत नसलेल्या जिल्ह्यातील ४७ हजार मतदारांचा शोध घेऊन या सर्वांची वगळणी करून जिल्ह्याने त्यांची संख्या शून्यावर आणली आहे. जिल्ह्यात डबल फोटोवाले ७४ हजार मतदार असून त्यांच्या वगळणीसाठीही प्रशासनाकडून छाननी सुरू असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT