Maharashtra Weather Update esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update Maharashtra: पुणे कोकणासह राज्याच्या या भागात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, तुमच्या भागातील हवामान कसं असेल?

Weather News Maharashtra: हवामान विभागाने पुढील दोन दिवसात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेंत वाढ झाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, यामुळे अनेक भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेंत वाढ झाली आहे. दरम्यान पुणे शहरात पुढील तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शहरात कमाल तापमानाचा पारा ३९.६ अंशांवर आला आहे. तर, किमान तापमान २१.७ अंश सेल्सिअस होते.

येत्या २४ ते २६ एप्रिल रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे व मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर, २७ ते २९ एप्रिलदरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. या दरम्यान कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार आहे.

पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात बुधवारी (ता. २३) वादळीवारे, ढगांच्या गडगडटासाह पावसाच्या सरी पडतील, असा ‘यलो अलर्ट'' हवामान खात्याने मंगळवारी दिला. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर बुधवार उष्ण दिवस ठरेल, असा इशाराही खात्याने दिला आहे.

राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका वाढला होता. राज्यात पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे सर्वाधिक म्हणजे ४२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल मालेगाव येथे ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे विषम हवामान राज्याच्या काही भागांत अनुभवायला मिळत आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान कमी-जास्त होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह बुधवारी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

वादळी पावसाच्या शक्यतेचे कारण

दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगडपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT