cold  esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात गारठा आणखी वाढणार! पुढच्या दोन दिवसात थंडीची लाट

अवकाळीच्या पावसामुळे पारा घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

अवकाळीच्या पावसामुळे पारा घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात थंडीचा तडाखा वाढला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने (IMD)दोन दिवसांपर्वी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाजही वर्तवला होता. अवकाळीच्या पावसामुळे पारा घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. आता पुन्हा एकदा पुढील 2 दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यातील काही भागात थंडीची (Cold) हीच स्थिती (cold day) राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. परिणामी पुढील 2 दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात (Marathwada) थंडीची लाट (cold wave) येण्याची शक्यता आहे.

यंदाच्या मोसमातील सर्वात किमान तापमानाची नोंद यावर्षी झाली आहे. त्यामुळे पहाटेसह दिवसभर हुडहुडी जाणवत आहे. राज्यभरातील सर्वच थंड हवेच्या ठिकाणी बोचरी थंडी पडली आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यात सातत्याने बर्फवृष्टीही होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून महाराष्ट्राच्या (Maharashra) दिशेने गार वारा सुटला आहे. परिणामी महाराष्ट्र आणि मुंबईतील किमान तापमान अधिक घसरले आहे. त्यामुळे महामुंबईतही थंडीची लाट आली आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याने राज्यात गारवा अनुभवता येणार आहे.

तीन ते चार दिवस थंडीचा जोर

गेल्या २४ तासांत थंडीचा पारा घसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रदेशातील नागरिकांनी या मोसमातील सर्वात कडक थंडीचा अनुभव घेतला आहे. पुढील तीन ते चार दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT