Urfi Javed Controversy sakal
महाराष्ट्र बातम्या

Urfi Javed Controversy: उर्फी प्रकरणात चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर असलेले महिला आयोग काय काम करते?

Urfi Javed Controversy : उर्फी प्रकरणात राज्य महिला आयोग काय म्हणाले?

निकिता जंगले

Urfi Javed Controversy : सध्या राज्यात उर्फी जावेदचा मुद्दा चांगलाच गाजतोय. भाजपनी उर्फी जावेद परिधान करत असलेल्या कपड्यांवरून तिच्या विरोधात भूमिका घेतली. एवढंच काय तर अपेक्षित उत्तर न मिळाल्याने राज्य महिला आयोगाच्या कामावरही चित्रा वाघ यांनी ताशेरे ओढले. याच महिला आयोगाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Urfi Javed Controversy chitra wagh blaming on mahila aayog )

उर्फी प्रकरणात राज्य महिला आयोग काय म्हणाले?

उर्फी जावेद प्रकरणात महिला आयोगाने उर्फीच्या बाजूने सॉफ्ट कॉर्नर दाखवला होता. प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे आपण त्यांना अडवू शकत नाही. असं महिला आयोग म्हणाले होते.

महिला आयोग कशासाठी आहे?

महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे एक वैधानिक मंडळ आहे. या आयोगाची स्थापना १९९३ सालच्या महाराष्ट्र कायदा क्रमांक XV च्या अंतर्गत झाली आहे. आयोग महिलांशी संबंधित विविध मुद्द्यांवर संशोधनात्मक अभ्यास करतो. शिवाय महिलांच्या हितार्थ बाजू मांडतो.

आयोग जन्मपूर्व लिंग निदान पद्धती (नियम आणि गैरवापर प्रतिबंध) कायदा १९९४ ची कठोर अंमलबजावणी आणि प्रसार माध्यमांतून  महिलांच्या प्रतिमेबद्दल असंवेदनशीलता निर्माण करणे,  अशा विशिष्ट मुद्द्याबद्दल विशेष दक्ष असतो.

महिला आयोग काय काम करतं?

  • महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे.

  • महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणे आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे.

  • महिलांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे.

  • महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा यामध्ये सुधारणा तसेच उन्नती करण्या संबंधित सर्व मुद्द्यावर शासनाला सल्ला देणे.

  • गरजू महिलांना समुपदेशन आणि नि:शुल्क कायदेशीर सल्ला देणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

Nagarparishad Reservation 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर! राज्यातील ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, तर २३ एसी-एसटीसाठी राखीव, ओबीसी महिलांना किती?

Samsung Galaxy च्या तीन नव्या सिरीज लाँच; 7 हजारपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, दमदार फीचर्स अन् जबरदस्त ऑफर्स..

CJI B. R.Gavai : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, आरोपी म्हणाला, सनातन धर्म जर...

Video: 'तुझं हे जे सुरुये ते बंद कर' निक्कीने आरबाजला झापलं! म्हणाली...'बाहेर काय सुरुये हे तुला...'

SCROLL FOR NEXT