chitra wagh
chitra wagh Team eSakal
महाराष्ट्र

भाजपाच्या कार्यक्रमाला गेल्याने शिवसेना आमदाराची महिलेला मारहाण?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपाखाली शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर दोन दिवसापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. ही घटना ताजी असतानात आज पुन्हा वैजापुरात शिवसेना (Shiv Sena) आमदाराने महिलेला बेदम मारहाण केली. यावर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. शिवरायांच्या (Shivrai) महाराष्ट्रात (Maharashtra)महिलांच्यावर अत्याचार होत आहेत. हे सरकार गोरगरीबांचं धार्जीणं नाही. महाराज असते तर कडेलोट केला असता हो या सरकारचा अशी तिखट प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला

हे सरकार गोरगरीबांचं धार्जीणं नाही. महाराज असते तर कडेलोट केला असता हो या सरकारचा

वैजापूरचे (Vaijapur) शिवसेना आमदार रमेश बोरणारे (Ramesh Bornare) यांनी भाजपच्या कार्यक्रमाला गेलेल्या महिलेला बेदम मारहाण केली.यावर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत ट्विट केले. यामध्ये त्या म्हणातात, आज म्हणे महिलाधोरणाचा मसुदा शिवरायांच्या चरणी अर्पण केलायं. शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेली म्हणत महिलेला बेदम मारहाण केली. यावर गुन्हा दाखल झाला पण कारवाई शुन्य. उलट आज पिडीतेवरचं ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावर महिलाधोरणकर्ते काही बोलणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठाकरे सरकारवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, अजून किती बलात्कारी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाचवणार आहात. महाराज असते तर कडेलोट केला असता हो या सरकारचा. हे सरकार गोरगरीबांचं धार्जीणं नाही तर सरकारचे कलाकारी मंत्री आमदार खासदार व त्यांच्या बगलबच्चे धार्जीणं आहे असा घणाघात यावेळी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; सकाळी नऊ वाजेपर्यंत राज्यात 6.45% मतदान

Lok Sabha Voting: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, पुण्यासह, संभाजीनगरमध्ये मतदार खोळंबले

VIDEO: अन् अनुष्कानं थेट हात जोडले; आरसीबी मॅच जिंकताच विरुष्काचं हटके सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

SBI Hiring: स्टेट बँक देणार हजारो नोकऱ्या! 3,000हून अधिक नवीन शाखा उघडण्याची बँकेची योजना

Chinese Spy: सायकलवरुन प्रवेश, मोबाईलमध्ये धक्कादायक फोटो अन्... गुप्तहेर असल्याचा संशय, चिनी नागरिक अटकेत

SCROLL FOR NEXT