Vasant More Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम! वसंत मोरे औरंगाबादकडे रवाना

वसंत मोरे नाराज असल्याने राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यादरम्यान कुठेच दिसले नाहीत, अशा चर्चा सुरू होत्या.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आता अगदी काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते औरंगाबादकडे सभेसाठी रवाना होत आहेत. पुण्यातले मनसे नेते वसंत मोरेही औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

औरंगाबाद सभेपूर्वी दोन दिवस राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंचे जवळचे कार्यकर्ते वसंत मोरे कुठेच दिसले नव्हते. त्यामुळे वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा रंगत होती. भोंग्यांबद्दलची भूमिका राज यांनी मांडल्यानंतर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तातडीने मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नाराज असल्याने वसंत मोरे राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान आले नाहीत अशा चर्चा रंगत होत्या.

त्याच दिवशी वसंत मोरे यांनी आपल्या एका सहकाऱ्याच्या घऱी इफ्तार पार्टी करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे या चर्चांना आणखीनच हवा मिळाली. वसंत मोरे आजारी असल्याने राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान दिसले नाहीत, असंही काही जणांचं म्हणणं होतं. मात्र त्यानंतर आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. वसंत मोरे यांनी व्हिडीओ शेअर करत आपण ठणठणीत असून औरंगाबादला जात आहोत, असं स्पष्ट सांगितलं आणि आता वसंत मोरे कार्यकर्त्यांसह सभेसाठी औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नसराई सुरू होण्याआधी सोन्याचे भाव कोसळले! 10 महिन्यांतील सर्वात स्वस्त सोनं; तुमच्या शहरात सोनं किती रुपयांनी स्वस्त?

NCP Merger: सुप्रिया सुळे-पटेल यांच्यात खलबते, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर

Marleshwar Temple Accident : डोंगराच्या कड्यावरून दगड कोसळून मार्लेश्वरात 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू; वडील, चुलते गंभीर जखमी, सांगलीच्या कुटुंबीयावर आघात

Latest Marathi News Live Update: शक्तिपीठ महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये बदल करा, शिंदेंच्या आमदाराची मागणी

India vs Pakistan Final: भारत-पाकिस्तान आशिया चषकाच्या जेतेपदासाठी भिडणार; सामना केव्हा, कुठे Live पाहता येणार?

SCROLL FOR NEXT