vidhan sabha 2019 bjp shivsena alliance bjp meeting delhi udhav thakrey 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019:युतीचं काही ठरेना; काय चाललंय भाजप-शिवसेनेचं?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर होऊन, एक आठवडा उलटला तरी, भाजप-शिवसेना युती जाहीर झालेली नाही. दोन्ही पक्षांचे नेते युती होणार, युती होणार, असा सतत दावा करत असले तरी, युतीविषयी निव्वळ आडाखेच बांधले जात आहेत.

भाजपची पुन्हा बैठक
भाजपच्या सांसदीय पक्षाची उद्या (रविवार, २९ सप्टेंबर) पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीबाबत निश्चित माहिती मिळाली आहे. सध्या भाजपचे जवळपास १०० जागांवरचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यात विद्यमान आमदारांना प्राधान्य देण्यात आल्याची माहिती आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडे राज्यातील सर्व २८८ जागांवरचे उमेदवार तयार आहेत. पण, शिवसेनेला १२६ जागा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे तशी गरज पडणार नाही, असे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. उद्याच्या दिल्लीतील बैठकीत शिवसेना-भाजप यांच्यात वाद असलेल्या जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय नितीन गडकरी, तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा, जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.

‘शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे’
मुंबईत आज, रंगशारदा सभागृहात शिवसेनेचा मेळावा झाला. त्याला राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना गेली पाच वर्षे सत्तेत होती. तरी पाच वर्षे संघर्षाची होती, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचवेळी ‘मला यावेळी विधानसभेत सत्ता हवी आहे’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी वेगळे संकेतही दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राज्यात गेली पाच वर्षे संघर्षाची होती. त्याकाळात शिवसैनिक माझ्यासोबत होते. त्यामुळे तुमचे आभार. मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे. मी शिवसेनाप्रमुखांना तसा शब्द दिला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT