social media campaign
social media campaign 
महाराष्ट्र

उमेदवारांच्या सोशल मीडिया कॅम्पेनसाठी ‘ही’ आहे नियमावली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सध्या कोणत्याही निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडिया कॅम्पेनचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पण, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली प्रसिद्ध केली आहे. आचारसंहितेबरोबरच महाराष्ट्र आणि हरियानातील विधानसभा निवडणुकीला ही नियमावली लागू झाली आहे.

प्रचारावर असणार आयोगाची नजर
गेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात सोशल मीडियावरील प्रचाराला आयोगाने नियमावलीत बसवले होते. आता विधानसभा निवडणुकीत आयोगाने या नियमावलीत आणखी स्पष्टता आणली आहे. सोशल मीडिया कॅम्पेनचा प्रत्येक मजकूर आता मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीच्या चाळणीतून जाणार आहे. आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेमध्ये म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराची टीव्ही, वर्तमानपत्र, रेडिओ, सिनेमा हॉल अशा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरील जाहिरात तसेच, सोशल मीडियावर तसेच मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून प्रसिद्ध  होणारी प्रत्येक पोस्ट आयोगाच्या कमिटीला दाखवून करावी लागणार आहे. या विधानसभा निवडणुकीतही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. यात व्हॉट्सअपसह ट्विटर, फेसबुक, इन्सटाग्रामचा वापर अधिक होणार आहे. या प्लॅटफॉर्मवरील उमेदवाराच्या अधिकृत अकाऊंटवर आयोगाची नजर असणार आहे.

अशी आहे नियमावली

  1. निवडणूक प्रचारात इतर माध्यमांसंदर्भात लागू करण्यात येणारे सर्व कायदेशीर नियम हे सोशल मीडियावरील प्रचारालाही लागू होणार आहेत.
  2. उमेदवारांना अर्ज भरतानाच त्यांच्या सोशल मीडियावरील अधिकृत अकाऊंटची माहिती द्यावी लागणार आहे.
  3. सोशल मीडियावर कोणताही मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीकडून त्याला मान्यता घ्यावी लागणार आहे.
  4. सोशल मीडियावर प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचा समावेश उमेदवाराच्या एकूण निवडणूक खर्चामध्ये गृहित धरला जाणार आहे.
  5. इंटरनेटवर सोशल मीडिया साईट्स आणि वेबसाईट्सवर करण्यात येणारे कॅम्पेन आणि जाहिरातींसाठी वापरल्या जाणाऱ्या पेमेंट मोडची माहिती कमिटीला द्यावी लागणार आहे.
  6. त्याचबरोबर इंटरनेटवरील जाहिरातींसाठी जो कंटेंट वापरला जाईल, तो तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा तपशीलही द्यावा लागणार आहे.
  7. तसेच सोशल मीडिया कॅम्पेनसाठी काम करणाऱ्या टीमला देण्यात आलेल्या पगाराचा तपशीलही या खर्चाच्या यादीत असेल
  8. उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून करण्यात येणाऱ्या सोशल मीडिया कॅम्पेनला आचारसंहितेचे सर्व नियम लागू होतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT