Vijay Wadettiwar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Vijay Wadettiwar: 'गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन', वडेट्टीवारांचा Video शेअर करत खोचक टोला

Vijay Wadettiwar Shared Nilesh Ghaiwals Video: राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे, असं म्हणत वडेट्टीवारांनी खोचक टोला लगावला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

"गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे", असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याच्यासह काहीजण मंत्रालयाच्या आवारात व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यासंबधीची पोस्ट वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केली आहे.

पोस्टमध्ये काय म्हणालेत विजय वडेट्टीवार?

"गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे."

"नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती "मोदी की गॅरंटी" ?", अशा शब्दात वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये काही गुंडांनी काही नेत्यांची भेट घेतल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, दिवसेंदिवस सरकारचे घोटाळे समोरं येत आहेत. सरकारने क्लृप्त्या लढवणे आणि घोटाळे करणे असं सुरु केलं आहे. मंत्रालयात गुंड निलेश घायवाळ रील तयार करतो सोबत त्याचे इतर गुंड देखील आहेत. हा कशी काय एवढी हिंमत करतो. मुख्यमंत्र्याना भेटायला जातो हे कस काय शक्य होतंय? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली, त्यानंतर पुण्यातील गुंड निलेश घायवळ याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT