Vinayak Mete esakal
महाराष्ट्र बातम्या

Vinayak Mete: 'मदत मागत होतो पण कोणी आलं नाही'; मेटेंच्या ड्रायव्हरचा आरोप

धनश्री ओतारी

अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. यानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोनही उचलला गेला नाही. असा आरोप विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या ड्रायव्हरने केला आहे.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, अपघातस्थळींच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या अपघातानंतर जवळपास 1 तास विनायक मेटे यांना मदत मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

मेटेंच्या निधनानंतर ड्रायव्हरचा गंभीर आरोप

यावेळी मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हेदेखील त्यांच्यासोबत होते. त्यांनी या अपघाताबद्दल माहिती देताना गंभीर आरोप केले आहेत. एका ट्रकने कट मारल्याने बीडकडून मुंबईकडे येताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला. अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. यानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोनही उचलला गेला नाही. मदतीसाठी अनेकदा कदम विनवणी करत होते. मात्र, कोणीही गाडी थांबवली नाही, अशी माहिती कदम यांनी दिली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचार सुरू असतानाच मेटे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT