Vinayak Raut vs Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीसांचा पोपट केलाय; राऊतांची टीका

'शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तुंबळ युद्ध काही दिवसांत पहायला मिळेल.'

सकाळ डिजिटल टीम

'शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तुंबळ युद्ध काही दिवसांत पहायला मिळेल.'

मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात तोंडाला पानं पुसल्या जातील तेव्हा त्यांच्यातील युद्ध अटळ आहे, असा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केलाय. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

शिंदे-फडणवीसांकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विलंब लावला जात आहे. यावरून शिवसेना खासदार राऊतांनी उमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंच शिल्लक राहिलेत. देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झाले असून त्यांची नाराजी मध्येमध्ये दिसते. केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पोपट केलाय, असा घणाघात राऊतांनी केलाय. विनायक राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तुंबळ युद्ध काही दिवसांत पहायला मिळेल. मंत्रिपद न मिळाल्यास अनेक आमदार मानगुटीवर बसणार आहेत. तोंडाला पाने पुसली गेल्यानंतर 100 टक्के शिंदे गटात बंडखोरी होणार आहे. अतृप्त आत्मे एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या उरावर बसणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्यांना स्वत:चा आवाज नाही. त्यांचे बोलवते धनी दिल्लीत आहेत. देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झाले आहेत, असं राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.

पावसाळा संपल्यानंतर उद्धव ठाकरे जिल्हा निहाय दौरा करणार : राऊत

शिवसेनेतून काही लोक बाहेर पडले तरीही जे उरले आहेत, त्यांच्यासोबत पुन्हा एकदा झेप घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. पावसाळा संपल्यानंतर उद्धव ठाकरे जिल्हा निहाय दौरा करणार आहेत. 23 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील पदाधिकारी मुंबईत त्यांची भेट घेण्यासाठी येतील. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून उद्धव ठाकरे महाराष्ट्रात दौरे आयोजित करतील, अशी माहिती राऊत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT