Narayan Rane Vinayak Raut Google
महाराष्ट्र बातम्या

नारायण राणे वीजमंडळाचे देशातील पहिले लाभार्थी ; राऊतांचा हल्लाबोल

राणेंचा राजकीय विमा संपला होता मोदींनी तो रिन्यू केला;विनायक राऊतांचा राणेंवर हल्ला

सकाळ डिजिटल टीम

राज्यभर होळीचा सण साजरा होत आहे. रंगांची मुक्त उधळण करून एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न होत आहे. याउलट या होळीत राजकीय रंग मात्र वेगळाच चढला आहे. एकमेकांवर आरोप करत ही होळी साजरी केली जात आहे. दरम्यान शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर बोचरी टिका केली आहे. राणेंचा राजकीय विमा संपला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तो काही दिवसांसाठी सुरु केला आहे. असा हल्लाबोल विनायक राऊतांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी निशाणा साधला आहे.

यावेळी राऊतांनी राणेंना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, राणेंना मिळालेले केंद्रातील मंत्रिपद सुखाने अनुभवावे त्याचा लाभ घ्यावा. अर्थात त्यांनी लाभ घेण्यास आधीच सुरुवात केली आहे. विजमंडळाचे देशातील पहिले लाभार्थी हे राणे आहेत. काथ्याचा उपक्रम हा त्यांनी स्वत:च्या इमारतीत सुरु केला आहे. त्याचे जवळपास २ लाख भाडे घेण्यास सुरुवात केली आहे. लाभार्थ्यांची जी काही परंपरा तुम्ही चालू केली आहे. ती तुमच्या कुटुंबाला सुखदाई होऊ अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

दिशा सालियान प्रकरणावर ते म्हणाले, एखाद्या पिडीतेचे नाव घ्यायच नाही हे सर्वोच्च न्यायालयाने याधीच सांगितले आहे. तरीसुध्दा बलत्कार झालेल्या तरूणीचे सतत नाव घेऊन तिला बदनाम केले जात आहे. तिच्या कुटुंबाचे नाव बदनाम केले जात आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT