ashish shelar savarkar shivaji maharaj esakal
महाराष्ट्र बातम्या

माफीनाम्याच्या पत्रावर शेलारांकडून सावरकरांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं. त्यात आता आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरकर यांच्या माफीनाम्याच्या पत्राची थेट शिवाजी महाराजांच्या अफजल खान भेटीशी तुलना केली. (Ashish Shelar news in Marathi)

आशिष शेलार यांनी इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी लिहिलेले पत्र वाचून दाखवले. शेलार पुढं म्हणाले की, राहुल गांधी यांनी नेहरूजींना वाचलं नाही. इंदिराजींचा अभ्यास केला नाही. केरळमधून निवडून आल्यानंतर केवळ हिरव्या झेंड्याचा अभ्यास केलेला दिसत आहे. राहुल यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. तसेच उद्धव ठाकरे यांनी तरी बोटचेपी भूमिका घेऊ नये, अशी आमची अपेक्षा होती. मात्र सत्तेसाठी माती खाल्ली, असंही शेलार म्हणाले.

केवळ मी आणि माझा पक्ष तसेच पक्षाला सत्ता देणारे सहकारी यासाठी उद्धव यांनी आपल्या वडिलांच्या विचारांना तिलांजली दिली. तुम्ही अशी बोटचेपी भूमिका का घेतली, असा सवालही शेलार यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

हेही वाचा Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

उद्धवजींना विनंती आहे की, त्यांनी अभ्यास करावा. डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन काळातील वर्गांमध्ये महात्मा गांधींनी भेट दिली होती. या भेटीत संघ स्वयंसेवकांनी सेवा दिली होती. शिवाय महात्मा गांधींच्या विदर्भ भेटीतही स्वयंसेवकांनी सेवाकार्य केलं होतं, असंही शेलार यांनी म्हटलं.

दरम्यान आशिष शेलार यांनी सावरकर यांच्या माफीच्या पत्राची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केली आहे. शेलार म्हणाले की, आपल्याकडे असंख्य महापुरुष आहेत जे दोन पावले मागे येऊन पाच पावले पुढं गेली. शत्रुला अलिंगन देऊन समोरच्यावर हल्ला करणारे आणि मी घाबरलो अस दाखवून समोरच्याचा कोथळा काढणारे असे अनेक महापुरुषांचे दाखले आहेत, असं म्हणत शेलार यांनी शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ऐन दिवाळीत सोनं स्वस्त! धनत्रयोदशीनंतरही भाव घसरले; 10 ग्रॅमचा दर पाहून ग्राहकांची गर्दी, पाहा सोनं-चांदीचे ताजे भाव

IND vs NZ 2nd ODI Live : शुभमन गिल, हे काय केलंस... लोकेश राहुलसह सर्वच अचंबित; डॅरिल मिचेल तंबूच्या दिशेने निघालाच होता, पण.. Video Viral

Elephant Maya: ‘माया’च्या मदतीला अंबानींची ‘वनतारा’; केरळहून हवाई मार्गाने जामनगरमधील उपचार केंद्रात दाखल

Latest Marathi News Live Update : दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता ; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Sindhudurg Health: औषध खरेदीची फाईल सीईओंकडे प्रलंबित; आरोग्य समिती सभा; ग्रामीण भागातील जनता कार्यालयात आणण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT