महाराष्ट्र

मुस्लिम उमेदवारांविषयी प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान 25 जागांवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. "एमआयएम'सोबत आघाडीसाठी चर्चा सुरू असून आप आणि डाव्या पक्षांशीही चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष लोकसभेपूर्वी एकत्र आले होते. विधानसभेतील जागावाटपाच्या मुद्यावरून एमआयएमने वंचितचा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी किमान 25 जागांवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. "वंचित'ला ऑल इंडिया उलेमा बोर्डानेही आज सशर्त पाठिंबा जाहीर केला.

"वंचित'ची सत्ता आल्यास मुस्लिमांना शिक्षणात दहा टक्के आरक्षण, वक्‍फ बोर्डाच्या अतिक्रमित जमीनी बोर्डाला परत करणे, मॉब लिंचिंगविरोधात कठोर कायदा बनविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उलेमा बोर्डाने "वंचित'ला आपला पाठिंबा जाहिर केला आहे. उलेमा बोर्डाशी चर्चा करूनच 25 मुस्लिम उमेदवारांची नावे ठरवली जाणार असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. एमआयएमसोबतच्या आघाडीबाबत विचारले असता, त्यांनी दरवाजे बंद केले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडेच आहेत. धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, हीच आमची भूमिका असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

याशिवाय आम आदमी पार्टी आणि डाव्या पक्षांशीही सकारात्मक चर्चा सुरू आहे. लवकरच वंचित आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

इव्हीएम हॅकिंग शक्‍य

मतपत्रिका इतिहासजमा झाल्या असून "ईव्हीएम'वरच निवडणुका घेणार असल्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. 'ईव्हीएम'विरोधात उच्च न्यायालयात 41 याचिका दाखल झाल्या आहेत. "ईव्हीएम' हॅक करता येत नाही, हे आयोगाने न्यायालयासमोर सिद्ध करून दाखवावे. हॅकिंग शक्‍य असल्याचे आम्ही सिद्ध करून दाखवू. या प्रकरणी आयोग पळ काढत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT