Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुण्यासह १२ जिल्ह्यांत पावसाचा इशारा; कुठे कडक उष्णता तर कुठे पावसाचा इशारा

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या ठिकाणी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यासह राज्यातील ११ जिल्ह्यांना सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह आज (गुरुवारी ता. २५) पाऊस पडण्याचा 'यलो अलर्ट' हवामान खात्याने बुधवारी दिला. या दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीवरील उन्हाचा चटका वाढेल, असा इशाराही खात्याने दिला आहे.

राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तेथे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.३ अंश सेल्सिअसने वाढला होता. मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान होत असून नांदेड, परभणी, जालना, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने तडाखा दिला. राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले.

तर सांगली, अहमदनगर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

■ उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

■ वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT