Weather Update Maharashtra Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update Maharashtra: उष्णतेपासून दिलासा! राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Weather Update Maharashtra: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Weather Update Maharashtra: राज्याच्या काही भागात उन्हाचे चटके जाणवत असतानाच, पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. तर विदर्भातही पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि गारा पडतील, असा इशाराही हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

राज्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा कडाका काहीसा कमी जाणवत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह रविवारी (ता. ७) पावसाचा इशारा, तर सोमवारी (ता. ८) विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यात शनिवारी सोलापूरमध्ये ४२.४ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर, यवतमाळ येथे तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे होता. तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड यांसह विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वाशीम, वर्धा येथे तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक होता.

पुण्यात बुधवारी पावसाची शक्यता

पुण्यात रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर गुढीपाडव्याच्यादिवशी (ता.९) आकाश अंशत: ढगाळ राहील. मात्र, बुधवारी (ता.१०) अंशत: ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. कोरेगाव पार्क येथे शनिवारी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर लोहगाव, चिंचवड, लवळे आणि मगरपट्टा येथे ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

काही भागात ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट

नागपूर, गोंदिया, यवतमाळ या ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाती शक्यता वर्तवण्यात येत आहे. अकोल्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT