Signs of cyclone formation in Arabian sea
Signs of cyclone formation in Arabian sea 
महाराष्ट्र

अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळाची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

पुणे - येत्या चार दिवसात अरबी समुद्रात (arabia sea) चक्रीवादळ (cyclon) निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे समुद्रात चक्रीवादळ निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नैऋत्य मोसमी पावसासाठी यामुळे पोषक वातावरण तयार होऊ शकते. हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने जाईल. परिणामा याचा महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारपट्टीला धोका नसल्याचंही सांगण्यात येत आहे.

हवामान विभागाने याआधी मोसमी वाऱ्याबाबत अंदाज वर्तवला आहे. यंदा 1 जूनला वेळेत मोसमी वारे भारतात पोहोचतील असा अंदाज व्यक्त केला होता. पावसाचा अंदाज वर्तवताना 98 टक्के पाऊस होईल असंही हवामान विभागाने म्हटलं होतं. मोसमी वारे येण्यास अद्याप तीन आठवड्यांचा कालावधी आहे. यासाठी पोषक असं वातावरण अरबी समुद्रात तयार होत आहे.

दक्षिण अरबी समुद्रात 15 मे च्या आसपास चक्रीवादळाची शक्यता आहे. वादळ उत्तर पश्चिमेला सरकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, १४ मे रात्री पासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मच्छिमारांना व बोटींना परत येण्यास तसंच समुद्रात जाऊ नये असं सांगितलं आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, कमी दाबाच्या तीव्र क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. तसंच 15 मे रोजी कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन पुढच्या दोन ते तीन दिवसात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT