Rain Sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : भर उन्हाळ्यात यंदा पडणार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

यंदा फेब्रुवारी महिन्यातच पारा चाळिशीजवळ गेला होता. त्यामुळे उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदाचा उन्हाळा काहीसा कडक असेल, असाही हवामानाचा अंदाज आहे.

मार्च महिन्यातले तीन दिवस ४ ते ६ मार्च या कालावधीत हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच पारा चाळिशीजवळ गेला होता. त्यामुळे उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.

कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर सहा मार्च रोजी विदर्भामध्ये सगळीकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातल्या तापमानात मात्र विशेष घट होत नसल्याने सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सियसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे अतिशय कमी प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalu Yadav Family Dispute : रोहिणी नंतर आता आणखी तीन बहि‍णींनी नाते तोडले, लाल प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह थांबेना

Sharad Pawar: सरसकट पैसे वाटण्यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करू: शरद पवार : काँग्रेस संपेल असे वाटत नाही, नेमकं काय म्हणाले?

राज्यात गारठा वाढणार! उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट, तर मुंबई-पुणेही गारठलं; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट

Capricorn Horoscope 2026: लव्ह लाईफमध्ये चढ-उतार...तर सिंगल व्यक्तींसाठी लग्नाच्या संधी; वाचा तुमचं वार्षिक राशीभविष्य

आजचे राशीभविष्य- 17 नाेव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT