Mahavitaran 
महाराष्ट्र बातम्या

बापरे! पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल एवढ्या ग्राहकांचा वीजपुरवठा होणार खंडित

सकाळवृत्तसेवा

पुणे - एप्रिल २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यासाठी महावितरणकडून पथके स्थापन करण्यात आली आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्यात येणार आहे, असे महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सांगितले. महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा. आवश्यकता असल्यास हप्त्यांची देखील सोय केलेली आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. वारंवार संपर्क साधूनदेखील ग्राहकांनी भरणा केलेला नाही.

त्यामुळे नाइलाजाने पुढील तीन आठवड्यांत या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे नाळे यांनी सांगितले. 
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १० महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक १२ लाख ६८ हजार ४८७ असून त्यांच्याकडे ८५६ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर १ लाख ३८ हजार ८७० वाणिज्यिक ग्राहकांकडे २६४ कोटी ३२ लाख आणि २२ हजार ४५४ औद्योगिक ग्राहकांकडे १२६ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे.

सद्यःस्थितीत थकबाकी
१०३२.८० कोटी - पुणे
१४०.३६ कोटी - सातारा
२५९.१२ कोटी - सोलापूर
१९२.५४ कोटी - सांगली
३३७.४३ कोटी - कोल्हापूर
पैकी १२४७ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या १४ लाख २९ हजार ८११ वीजग्राहकांनी १ एप्रिल २०२० पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT