महाराष्ट्र

Nashik News : गुजरातमध्ये पतीच्या स्मृतीनिमित्त पत्नीने बांधली विहीर; प्रा. भोंग यांना आढळले 11 अभिलेख अन नकाशे

महेंद्र महाजन

Nashik News : राणी उदयमती यांनी इसवी सन १०६३ मध्ये जमिनीखाली सात मजल्यांची पायऱ्यांची विहीर बांधली. जनतेच्या पाण्याची समस्या मिटवण्यासाठीची ही विहीर ‘राणी की वाव’ म्हणून ओळखली जाते.

पतीच्या स्मृतीनिमित्त पत्नीने बांधलेले देशातील हे पहिले स्मारक आहे, असे नाशिकमधील इतिहास संशोधक डॉ. रामदास भोंग यांनी सांगितले. प्रा. भोंग यांना अभ्यास भेटीवेळी विहिरीच्या पायऱ्यांवर अकरा अभिलेख कोरलेले आढळले असून, दोन नकाशेही त्यांना पाहावयास मिळाले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

प्रा. भोंग म्हणाले, की एक हजार वर्षे जुने अभिलेख आणि विहिरीचे नकाशे आहेत. इसवी सन १०६३ मध्ये सोलंकी वंशाची सत्ता स्थापन झाली. पाटण ही राजधानी केली. इथून सोलंकी वंशाच्या शासकांनी अनेक वर्षे शासन केले. या शासनाच्या काळात सोलंकी शासकांनी विविध लोकोपयोगी कामे केली.

पाटण हा गुजरातमधील कमी पर्जन्याचा भाग आहे. येथील जनतेला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. जनतेची ही समस्या सोडविण्यासाठी सोलंकी वंशाचे संस्थापक भीमदेव सोलंकी या शासकाची राणी उदयमती यांनी पाटणमध्ये विहीर बांधली.

भूगर्भाच्या बदलामुळे झालेल्या घडामोडीत ९०० वर्षे मातीच्या ढिगाऱ्याखाली ही विहीर गाडली गेली होती. पुरातत्त्व विभागाने हा अनमोल ठेवा पुन्हा जगापुढे आणला. युनेस्कोतर्फे २२ जून २०१४ ला ‘जागतिक वारसा’ म्हणून या स्थळाची घोषणा झाली.

विहिरीच्या पायऱ्यांची पाहणी प्रा. भोंग यांनी केली. त्या वेळी त्यांना सात मजल्याच्या विहिरीच्या पायऱ्यांवर तत्कालीन काळातील अकरा अभिलेख कोरलेले आढळले आहेत.

विहिरीच्या पाहणीवेळी त्यांच्यासमवेत नाशिकमधील डॉ. यशवंत साळुंके, डॉ. श्रीहरी थोरवत, प्रा. चंद्रप्रकाश कांबळे होते. प्रा. भोंग म्हणाले, की अभिलेख देवनागरी लिपीत असून, एका पायरीच्या खालील बाजूस कोरलेले आहेत.

हे अभिलेख राणी उदयमती यांनी सोलंकी वंशांच्या शासकांच्या सन्मानार्थ कोरलेले असतील. कारण अभिलेखात चासागदेव, आमदेव आदी शासकांची नावे आढळतात. अभिलेखाबरोबर याच पायऱ्याच्या एका बाजूस विहिरीच्या संरचनेचे दोन नकाशेही आढळून आले आहेत. हे नकाशे व विहिरीची नकाशात विहिरीचा मुख्य गोलाकाराचा भाग व मधील विहिरीचा आकार तसेच समोरील पायऱ्यांची रचना दिसते.

शंभर रुपयांच्या नोटेवर चित्रीत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे जुलै २०१८ मध्ये शंभर रुपयांच्या नोटेवर ही विहीर चित्रीत करण्यात आली आहे. पाटणच्या अगोदर अन्हिलपूर या नावाने ओळखले जाणारे हे स्थळ गुजरातची पूर्वीची राजधानी म्हणून ओळख होती. विहिरीची लांबी ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल आहे.

"अभिलेखांचा, तेथील शैव, वैष्णव पंथाच्या संबंधित प्रतिमांचा आणि विहिरींच्या अन्य भागाचा बारकाईने संशोधनात्मक अभ्यास व्हायला हवा. त्यातून सोलंकी वंशांच्या सामाजिक, सांस्कृतिक कार्यावर नव्याने प्रकाश पडेल हे मात्र नक्की!" - प्रा. रामदास भोंग, इतिहास संशोधक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT