Amravati MLA Sulabha Khodke esakal
महाराष्ट्र बातम्या

अशोक चव्हाणांनंतर आणखी एका आमदाराबाबत उलटसुलट चर्चा; NCP प्रवेशावर खोडकेंचं स्पष्टीकरण

अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच आणखी एका आमदाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू झालीय.

सकाळ डिजिटल टीम

अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच आणखी एका आमदाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू झालीय.

अमरावती : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच आणखी एका आमदाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू झालीय. अमरावतीच्या कॉंग्रेस आमदार सुलभा खोडके (Amravati Congress MLA Sulabha Khodke) यांच्याबद्दल जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. त्याला कारणही तसंच आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) गेल्या दोन दिवसांपासून अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. भारत जोडो अभियानांतर्गत अमरावती (Amravati) शहरासह जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात आमदार खोडके दोन्ही दिवस गायब होत्या. आमदार ही महत्वाची व्यक्ती प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात गायब असल्यानं कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या (NCP) गोटातही कुजबुज सुरू झाली.

आमदार खोडके राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तर गेल्या नाहीत ना, अशीही शंका काहींनी उपस्थित केली. कारण, त्यांचे पती संजय खोडके हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत. राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे ते कट्टर समर्थक असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळं या शंकेला बळ मिळतं, असं काहींचं मत आहे. मात्र, यावर सुलभा खोडके यांनी स्पष्टीकरण दिलंय. मी काँग्रेसमध्येच आहे, यापुढंही काँग्रेस पक्षाकडूनच निवडणूक लढवणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यामध्ये अनुपस्थित राहिली, याबाबत दिलगिरी व्यक्त करते. अशी पोस्ट आमदार खोडके यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावती विधानसभा मतदार संघ (Amravati Assembly Constituency) हा कॉंग्रेससाठी सोडण्यात आला होता. त्यामुळं खोडके यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT