महाराष्ट्र बातम्या

नियमांचे पालन करु, मात्र आषाढी पालखी सोहळा पायीच व्हावा

सकाळ डिजिटल टीम

देहू : यंदाच्या आषाढी वारीसाठी शासनाच्या नियमांचे पालन करू, मात्र पंढरपूरसाठी पालखी सोहळा हा गेल्या वर्षासारखा बसने नको, पालखी सोहळा हा पायीच व्हावा, अशी आग्रही भूमिका राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या संस्थानने शनिवारी (ता.15) व्हीसी बैठकीद्वारे झालेल्या बैठकीत घेतलेली आहे. वारकऱ्यांची संख्या शासनाने ठरवू द्या. मात्र पालखी सोहळा पायीच व्हावा, असे एकमत झाल्याची माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

यंदाचा पालखी सोहळा येत्या जुलै महिन्यात आहे. या पार्श्वभूमीवर विविध संस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याच्या संदर्भात गेल्या आठवड्यात चर्चा झाली होती. शनिवारी पुन्हा व्हीसीद्वारे बैठक झाली. यात संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे,माणिक महाराज मोरे, भानूदास महाराज मोरे,आळंदी संस्थानचे अभय टिळक, ढगे, सासवड संस्थानचे जयंत गोसावी, पैठणचे अरणे महाराज मोरे, जयंत महाराज व इतर उपस्थित होते.

नितीन महाराज मोरे यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पालखी सोहळा बसने पंढरपूरकडे आषाढीवारीसाठी नेण्यात आला. कोरोनाची कालमर्यादा सध्या कोणीही सांगू शकत नाही. कोरोनाला घेऊनच सर्व व्यवहार सध्या सुरु आहे. आम्हांला वारकरीच मध्यबिंदू आहे. यंदाच्या पालखी सोहळा शासनाच्या नियमानुसार करणार आहे. मात्र तो पायीच असावा. बसने नको. अशी सर्वाची भूमिका आहे. शासनाने संख्या ठरवावी. संख्या कमी जास्त होवू शकते. संत मुक्ताईचा पालखी सोहळा 14 जूनला आहे. त्यापूर्वी शासनाने एक जूनपर्यत भूमिका स्पष्ट करावी, असे ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT