Shivsena Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह ठाकरेंना मिळणार? आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी बंड केलं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना आपलीच आहे, असा दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचा (ठाकरे आणि शिंदे) युक्तीवाद ऐकला, व त्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेवर 18 सप्टेंबरला सुनावणी घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणी 3 आठवड्यांनी घेतली जाईल, असं सांगितलं होतं. त्यानुसार आज (बुधवारी) ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

निवडणूक आयोगाने कशाच्या आधावर शिंदे गटाला दिलं पक्षचिन्ह आणि नाव

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे पक्षचिन्ह आणि नाव देत असताना विधीमंडळातील आमदारांची संख्या आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीतील विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरली. या आकडेवारीनुसारच आयोगाने शिंदे गटाला पक्षचिन्ह आणि नाव दिलं होतं.

शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी 76% मते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना मिळाली होती. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांना 23.5% मते मिळाली आहे. त्यामुळे मतांची तसेच विधीमंडळातील आकडेवारी पाहता, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाचाच अधिकार आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय काय निर्णय हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

SCROLL FOR NEXT