Uddhav Thackeray AND ravi Rana 
महाराष्ट्र बातम्या

50 खोक्यांचा आरोप करणाऱ्या रवी राणांना आत टाकणार का? शिवसेनेचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

पुणे - एकनाथ शिंदे गटावर सातत्याने खोके घेतल्याचा आरोप होतोय. या आरोपांवरून शिंदे गटही आक्रमक झाल्याचं समोर आलं आहे. शिंदे गटाने आता खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनीच याबाबत सुतोवाच केले आहे. त्यावर उद्धव ठाकरे गटाची प्रतिक्रिया आली आहे. ( Uddhav Thackeray news in Marathi)

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, आमच्या सभा सुरू झाल्या की खालून लोकं घोषणा देतात. मग लोकांना पण आत टाकणार का? 50 खोक्यांचा उल्लेख हा स्वतः रवी राणा यांनीच केला होता. मग पहिली केस रवी राणा यांच्यावरच टाकावी लागेल, असंही अंधारे यांनी म्हटलं.

अंधारे पुढं म्हणाल्या की, राहिला प्रश्न अडीच हजार कोटीच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याचा तर माझं घर पाहिल्यावर त्यांनाच मला दोन पैसे द्यावे लागतील. आम्ही गरीब लोक आहोत आमच्याकडे फक्त जपण्यासाठी निष्ठा आहे, अशा शब्दात अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली.

यावेळी अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला. ही दोन्ही नेते विकृत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Festival Travel: बाप्पाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ५,००० जादा बसेस धावणार!

Shivsena : 'राजू शेट्टींची प्रकरणे माझ्याकडे, सतेज पाटील बगलबच्च्यांना पुढे करतात'; 'शक्तिपीठ'वरून क्षीरसागरांच्या शिलेदाराची टीका

Latest Marathi News Live Updates : महाबळेश्वरातील वेण्णा नदीचे पाणी रस्त्यावर, पाचगणीत सतत पावसाच्या धारा

'८७ रुपयांचा शाईचा पेन'ची रशियातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड; बालकलाकाराचा आनंद गगनात मावेना

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर महिनाभरात २.२४ लाख वाहनांची वर्दळ; एका महिन्यात २० कोटींचा महसूल

SCROLL FOR NEXT