sanjay raut sakal media
महाराष्ट्र बातम्या

जया बच्चन वाद; 2024 नंतर उलटी गंगा वाहू लागेल, राऊतांचे संकेत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून टीका करताना हवं तर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करा असं म्हटलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून टीका करताना हवं तर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करा असं म्हटलं होतं.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना विरोधी पक्षांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी म्हटलं की, काही क्षण सोडले तर पंतप्रधानांचे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात २२ दिवस दर्शन झालं नाही, काही अडचणी असतात. पंतप्रधान मोदी (PM Modi) उत्तर प्रदेशच्या प्रचारात दंग आहेत, गृहमंत्री महाराष्ट्रापासून इतर दौऱ्यात दंग आहेत. निदान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे संपूर्ण शासकीय, राजकीय कामं करतायत. चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला, चहापानाची चिंता करू नये. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ सक्षम आहे, गरज पडली तर ते विधानभवनात येतील असे राऊत म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) टीका केली की हवं तर आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्री करा. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटलं की, तुमच्या सल्ल्याची गरज नाही. तुमच्या सल्ल्यावरती राज्य चालत नाही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. मंत्रिमंडळ व्यवस्थित काम करतंय हे चंद्रकांत पाटलांना माहितीय, सल्ले कशाला देताय, विरोधी पक्षाचं काम चोख करा असंही राऊत म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी नियम बदलून निवड कऱण्याची तयारी सत्ताधारी पक्षाची आहे. त्यावरून विरोधकांनी टीका केली आहे. यावर प्रश्न विचारला असता राऊतांनी सांगितलं की, विधानसभा अध्यक्षांची निवड पद्धत नियमबाह्य वाटत असेल तर ते आम्ही केंद्राकडून आम्ही शिकलोय, धडे घेतलेत हे त्यांनी समजून जावं. केंद्राच्या पावलावर पाऊल टाकतोय आणि शिकतोय, केंद्र सरकार किती नियमाने वागतंय हे पूर्ण देशाला माहितीय. एखाद्या व्यवस्थेत काही बदल होत असतील, मोदी सरकारने असे अनेक बदल सात वर्षात केलेत असंही राऊतांनी फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना म्हटलं.

अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याची टीका होतेय यावर बोलताना राऊत म्हणाले की, 'इतर राज्यांमध्ये काय चाललंय ते पहावं लागेल. केंद्राने सूचना दिल्यात. नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांनुसार अधिवेशन होईल. विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी दिवस वाढवायचे नाहीत, कामाचे दिवस सरकारने ठरवलेत. गोंधळ घालण्यासाठी दिवस देता येणार नाहीत. कामाच्या दिवसात विरोधी पक्षाने त्यांचं काम करावं.'

जया बच्चन (jaya bachchan) यांच्या सुनबाई आणि मुलासंदर्भात ऐकलं, जे सरकारविरोधात बोलतील, वागतील त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना ईडी, सीबीआयच्या समोर उभा करणं हे सूत्र झालंय. २०२४ पर्यंत हे चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल असे यावेळी राऊत म्हणाले. केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. अधिवेशन गुंडाळल्यानतंर पुढची भूमिका काय? असे विचारले असता राऊत म्हणाले की, लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) प्रकरणी संबंधित व्यक्तीला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशात सत्ता बदल होईल आणि देशातही २०२४ ला सत्ता परिवर्तन होईल असं वातावरण आहे. सरकारला शेतकऱ्यांसमोर शरणागती पत्करावी लागली असंही राऊतांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: फसवणूक, रम्मी व्हिडीओ, वादग्रस्त वक्तव्य अन् कोर्टाचा दणका! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, पण हे न मिटणारे डाग...

किल्लेदारांच्या अपघातामागचा खरा सूत्रधार अखेर उघड होणार! ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक आनंदी पण....

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

दुर्दैवी घटना! 'अकोलेत विहिरीत पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू', नातेवाईंकाकडून घातपाताचा संशय..

मेस्सीवर कोट्यवधींची उधळण, भारतीय फूटबॉलकडे पाठ... गुंतवणुकीची कुणाची इच्छा नाही; भारताच्या कर्णधारानं व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT