Supriya Sule 
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: "पक्ष विधीनिषेध शून्य मार्गांनी...."; पवार, ठाकरेंचा फोटो अन् सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे भावना व्यक्त केल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच एक दीर्घ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही पोस्ट सध्या चर्चेत आलीए कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पक्ष विधीनिषेध शून्य मार्गांनी हे दोन्ही मराठी माणसांचे पक्ष भाजपनं फोडल्याचा उल्लेख त्यांनी केला. (With Sharad Pawar and Balasaheb Thackeray photo Supriya Sule FB post viral)

मोठ्या कष्टानं उभारलेले पक्ष

सुप्रिया सुळे म्हणतात, "आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण 'मराठी माणूस' अशी मराठी माणसाची व्याख्या केली होती. महाराष्ट्रीय माणसांनी प्रचंड मेहनत करुन, प्रागतिक विचार जोपासत विकसित महाराष्ट्राची उभारणी केली. अनेक क्षेत्रांत देशाला दिशा दाखविण्याचे काम केले. पण केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाने येनकेन प्रकारे मराठी माणसांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष विधिनिषेध शून्य मार्गांनी फोडले"

ताकद अन् प्रेम भाजपला बघवत नाही

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली. त्याचप्रमाणे शरद पवारांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करुन ती देशभरात पोहोचविण्याचं काम केलं. या दोन्ही नेत्यांनी आपल्या कुटुंबाचा समाजकार्याचा वारसा घेऊन प्रचंड मेहनतीनं डोंगराएवढं कार्य उभं केलं व देशभरात दबदबा निर्माण केला.

गेली साठ वर्षे या दोन्ही नेत्यांचे विचार आणि नेतृत्व मान्य करुन लाखो कार्यकर्त्यांनी हे पक्ष उभे केले. याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ॠणात आहोत. देशातील व महाराष्ट्रातील मायबाप जनतेनं बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेबांना भरभरून प्रेम दिलं. पण त्यांची ही ताकद आणि प्रेम भाजपला बघवत नाही.

तत्वशून्य फोडाफोडी

शरद पवारांनी तीन वेळा कर्करोगाशी झुंज दिली. प्रत्येक वेळी ते जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद यांच्या बळावर जनसेवेसाठी बरे होऊन पुन्हा कामाला लागले. यासाठी मायबाप जनतेचे आम्ही कायम ऋणी आहोत.

महाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसं कटकारस्थानं करून संपवण्याचा घाट भाजपानं घातला आहे. त्यासाठी केंद्रातील एजन्सीजचा बेसुमार गैरवापर केला जातोय, पाण्यासारखा पैसा ओतला जातोय.

महाराष्ट्रातील जनतेमध्ये आपापसात भांडणं लावून, त्यांची ताकद खच्ची करून भाजपला आनंद मिळतो. परंतू या तत्वशून्य फोडाफोडीतून राज्याची प्रतिमा मालिन करण्याचं पाप भाजप करत आहे. लोकशाही व्यवस्थेत अत्यावश्यक असणारी विरोधी पक्षांची आणि विचारांची 'स्पेस' भाजपाला मान्य नाही, हेच सातत्याने अधोरेखित होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: 'त्या' औषधाचं गूढ वाढलं! अशोक खरात प्रकरणात SIT कडून दोन डॉक्टरांची चौकशी

Wardha News: ‘स्मार्ट’ वर्ध्याचा चेहराच विद्रुप; जागोजागी अवैध पोस्टरबाजी; लाखोंचा महसूल बुडाला

CM Meeting Decision Gokul Dudh: ‘गोकुळ’दूध संघावर प्रशासक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय, प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती

Washim News: कारंजा तालुक्यात सूर्याचा प्रकोप; तापमान ४३ अंशांवर; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात कणेरीवाडीत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT