Sanjay Raut News  esakal
महाराष्ट्र बातम्या

मी चुकीचं काम केलेलं नाही; ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊतांचा आत्मविश्वास

राज्याचा खासदार, नागरिक म्हणून ईडीच्या कामात सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे

सकाळ डिजिटल टीम

राज्याचा खासदार, नागरिक म्हणून ईडीच्या कामात सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे

मी पळपुटा नाही. माझा देशातील केंद्रीय संस्था आणि ईडीवर विश्वास आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोर जाण्याची हिम्मत आहे. राज्याचा खासदार, नागरिक म्हणून या संस्थाना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज ईडीकडून त्यांची चौकशी होत आहे. दरम्यान, चौकशीली जाण्याआधी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut on ed enquiry in maharashtra)

खासदार राऊत म्हणाले की, मी निर्भय आणि निडर असल्यानं बेधडकपणे ईडीच्या कारवाईला समोर जाणार आहे. मी कधीच चुकीचं काम केलेलं नाही त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही. मी बेडरपणे चौकशीला सामोरा जातोय, असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे. राऊत यांची आज ईडीकडून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे. यावेळी ईडी कार्यालयासमोर राऊतांनी शक्तीप्रदर्शन केलं आहे. (maharashtra politics)

संजय राऊत यांना ईडीने समन्स (Sanjay Raut summoned by ED) बजावलं होतं. त्यानुसार त्यांना 28 जूनला चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. प्रवीण राऊत आणि पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या. अलिबागमधील आपल्या आयोजित सभेमुळे संजय राऊत मागील चौकशीला हजर राहू शकले नव्हते.

दरम्यान, इडीने राऊतांना तुर्तास वेळ देत १ जुलै रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. त्यानुसार आज राऊत चौकशीसाठी हजर झाले आहेत. संजय राऊत यांचे वकील विकास यांनी म्हटलं होतं की, ईडीने काही कागदपत्रही मागवली होती. मात्र, इतक्या कमी वेळात ही कागदपत्र जमा करणं कठीण होतं. त्यामुळे आम्ही ईडीकडे वेळ मागितला. यासाठी ईडीने वेळ वाढवून दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT