body building women google
महाराष्ट्र बातम्या

आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या नावाखाली महिला शरीरसौष्ठवपटूंची फसवणूक

संघटनेच्या या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी. त्यांनी वितरित केलेले प्रमाणपत्र कुठेही ग्राह्य धरले जाऊ नये, अशी मागणी या महिलांनी केली आहे.

नमिता धुरी

मुंबई : 'इंडियन बॉडीबिल्डींग अॅण्ड फिटनेस फेडरेशन'चे (Indian Body Building And Fitness Federation – IBBFF) सचिव संजय मोरे यांनी 'मि. युनिव्हर्स' स्पर्धेच्या नावाखाली खेळाडूंची फसवणूक केली असून नोंदणी शुल्काच्या रूपाने कोट्यवधी रूपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप महिला शरीरसौष्ठवपटू हर्षदा पवार, श्रद्धा आनंद आणि मेनका भाटिया यांनी केला आहे.

स्पर्धेदरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक आणि गैरवर्तन केल्याचा आरोपही या महिला खेळाडूंनी केला आहे. याबाबत तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जागतिक दर्जाची मि. युनिव्हर्स स्पर्धा भारतात होत असल्याचे या महिलांना सांगण्यात आले होते. त्यांनी स्पर्धेचे शुल्क म्हणून १५ हजार रुपये संस्थेकडे जमाही केले. प्रचंड मेहनत घेतली.

फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात बालेवाडीला पोहोचल्यावर एका सामान्य खोलीत या महिलांना राहावे लागले. जेवणाचा खर्चही स्वत:लाच करावा लागला. १५० देशांतील शेकडो खेळाडू स्पर्धेत उतरणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात परदेशी खेळाडूंच्या नावाखाली ग्वाटेमाला आणि कझाकस्तानचे मोजके खेळाडू होते. ८०० पेक्षा अधिक खेळाडू भारतीयच होते.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असल्यामुळे हौशी खेळाडूही सहभागी झाले होते. थोडक्यात संस्थेने १५ हजार रुपयांत आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू होण्याचे प्रमाणपत्रच खेळाडूंना विकून मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप श्रद्धा आनंद यांनी केला आहे.

संघटनेने कुणालाही शुल्काची पावती दिली नाही. ऑनलाइन शुल्क भरणाऱ्यांना पैसे वैयक्तिक खात्यावर भरायला सांगितले. त्यामुळे संघटनेच्या या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी. त्यांनी वितरित केलेले प्रमाणपत्र कुठेही ग्राह्य धरले जाऊ नये, अशी मागणी या महिलांनी केली आहे.

शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस सुरेश कदम यांनी महिला खेळाडूंना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच संजय मोरे यांच्या डॉक्टर पदवीबाबतही शंका उपस्थित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT