Rajesh-Tope 
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेसला विश्वासात घेऊनच काम

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार काम करत असल्याचा निर्वाळा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे, ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही, अशा आशयाचे वृत्त आल्याने त्याबाबत टोपे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विश्वासात घेऊनच महाविकास आघाडी सरकारचे कामकाज सुरू आहे, त्यामुळे नाराजीचा प्रश्न येत नाही. 

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याने काँग्रेस नाराज आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे थोरात यांनी वक्तव्य केले होते. याबाबत टोपे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत, असा खुलासा केला. 

काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात सर्वांत ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना विश्वासात घेऊनच काम होत आहे. काँग्रेसकडे दुर्लक्ष नाही. आघाडी सरकारची एक कोअर समिती आहे. ही समिती एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेते.
- राजेश टोपे, आरोग्य मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT