World EV Day 2021  sakal
महाराष्ट्र बातम्या

World EV Day 2021 : ई-वाहनांचे ‘सीएनजी’ होऊ देऊ नका

जागतिक इलेक्ट्रीक वाहन दिनानिमित्त 'या' क्षेत्रातील विविध तज्ज्ञांशी ‘सकाळ’ने संवाद साधला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, बॅटरींची विल्हेवाट, सुरक्षा आदी पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आवश्यक आहे. तो जर झाला नाही तर आज जी ‘सीएनजी’ वाहनांची अवस्था आहे. ती ई-वाहनांची होऊ शकते. त्यामुळे ई-वाहनांना सीएनजी होऊ देऊ नका, असा सल्ला ई-वाहन संशोधन आणि विकास क्षेत्रात कार्यरत विविध तज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक इलेक्ट्रीक वाहन दिनानिमित्त या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांशी ‘सकाळ’ने संवाद साधला असता, ही भावना प्रामुख्याने पुढे आली. केंद्र व राज्य सरकारे इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापरासंबंधी प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी नॅशनल इलेक्ट्रिकल मोबिलिटी मिशन प्लॅन २०२० ही अस्तित्वात आला आहे. मात्र, ई-वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच चार्जिंग स्टेशनचा विस्तार, त्यासंबंधीचे तंत्रज्ञान, लिथियम आयन बॅटरीचा पुनर्वापर, बॅटरी स्वॅपींग तंत्रज्ञान आदी संबंधी पायाभूत सुविधांचे संशोधन आणि विकास करणे आवश्यक असल्याचे या क्षेत्रातील संशोधकांनी म्हटले आहे.

राज्यांमधील एप्रिल ते जून २०२१ दरम्यानची ई-वाहन खरेदी (आकडे टक्क्यांत)

लिथियमला पर्याय हवा..

ई-वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरीज या लिथियम-आयनच्या आहेत. लिथियम, कोबाल्ट, निकेल या सर्व मूलद्रव्यांचे साठे भारतात आढळत नाहीत. ई-वाहनांच्या बाबतीत आत्मनिर्भरतेसाठी लिथियम वगळून इतर मुलद्रव्यांवरही संशोधन गरजेचे आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञ सोडीयम, ॲल्युमिनियमसारख्या पर्यायी मुलद्रव्यांवर संशोधन करत आहे. मात्र, हे तंत्रज्ञान स्थिरस्थावर व्हायला अजून बराच कालावधी जाईल, अशी माहिती सेंटर फॉर मटेरिअल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. रणजित हवालदार यांनी दिली.

भारतातील ई-वाहन क्षेत्रातील गुंतवणूक तिमाही : गुंतवणूक (कोटी रुपये)

ई-वाहनांकडे एक पर्यायी दळणवळण व्यवस्था म्हणून पाहायला हवे. त्याच्या वाढत्या वापराबरोबरच पायाभूत सुविधांच्या वाढीलाही सुरवात होईल. ई-वाहनांमधील बॅटरी तंत्रज्ञान सुरक्षित असून, बॅटरीचा स्फोट झाल्यावर लागणाऱ्या अग्निशामन यंत्रणेवरही युरोपात मोठे संशोधन झाले आहे.

- शेखर ढोले, प्रमुख, सुरक्षा आणि एकरूपता विभाग, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट, पुणे

चार्जिंग स्टेशनचा विस्तार, बॅटरी पुनर्वापर तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या संबंधीच्या पायाभूत सुविधांचा विस्तारातूनच ई-वाहनांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. त्याचबरोबर देशात उपलब्ध मूलद्रव्ये आणि संसाधणांच्या आधारे ई-वाहनांशी निगडित तंत्रज्ञान विकसित करावे लागेल.

- डॉ. रणजित हवालदार, शास्त्रज्ञ, सी-मेट, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT