raigad 1.jpg Sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रातील १४ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये सामावेश करण्यासाठी प्रयत्न

या वारसा स्थळांमध्ये स्वराज्यातील १४ किल्ल्यांचा सामावेश असून कोकणातील कातळ शिल्पाचाही सामावेश आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : महाराष्ट्रातील १४ किल्ले आणि इतर काही ठिकाणांना जागतिक वारसा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी पुरातत्व खात्याने निविदा मागवल्या असून त्यासंदर्भात मोठा प्रस्ताव युनेस्कोला पाठवण्यात येणार आहे. या वारसा स्थळांमध्ये स्वराज्यातील १४ किल्ल्यांचा सामावेश असून कोकणातील कातळ शिल्पाचाही सामावेश आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री अमित देशमुख हे यासाठी पाठपुरावा करत आहेत. याआधी महाराष्ट्राने प्राथमिक प्रस्ताव युनेस्कोला पाठवला होता. तो प्रस्ताव त्यांच्याकडून तत्त्वता स्विकारण्यात आला आहे. त्यानंतर ही सर्व ठिकाणे जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी कशी योग्य आहेत व त्यांचे कसे जतन करता येईल याचा मुद्देसूद प्रस्ताव तज्ज्ञांकडून तयार करुन घ्यावा लागतो. त्या प्रस्तावासह अहवाल परत युनेस्कोला पाठवण्यात येतो आणि त्यानंतर तज्ज्ञ लोकांकडून त्या ठिकाणची पाहणी केली जाते. त्यानंतर सदर स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याबाबत युनेस्को विचार करते.

महाराष्ट्राने पाठवलेल्या प्राथमिक प्रस्तावात रायगड, राजगडासहीत गोव्यातील फणसईमाळ येथील कातळशिल्पाचा सामावेश आहे. मराठा लष्करी स्थापत्य आणि गनिमी कावा या दोन गटात या १४ किल्ल्यांचा सामावेश करुन प्राथमिक प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात आला होता. हजारो वर्षांपूर्वी काढण्यात आलेली कातळशिल्पे ही देशाच्या संस्कृतीचे प्रतीक असून त्याचे जतन व्हायला पाहिजे असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

प्रस्तावात असलेली कातळ शिल्पे

महाराष्ट्र - कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी, कुडोपी

गोवा - फणसईमाळ येथील कातळशिल्प

प्रस्तावात असलेले किल्ले

रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग (कुलाबा), सुवर्णदुर्ग, खांदेरी

कातळ शिल्पे आणि किल्ल्यांच्या प्रस्तावासाठी युनेस्कोने तत्त्वता मान्यता दिली असून पुढच्या टप्प्यात तज्ज्ञांच्या सहभागातून विस्तृत प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात येणार आहे.

- डॉ. तेजस गर्गे, संचालक, पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT