politics google
महाराष्ट्र बातम्या

'चंद्रकांतदादा, महिला तुमचं दुकान कधी उखडून टाकतील कळणारही नाही'

'वेळ अशी आलीये की वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी स्वयंपाक करत बसावं लागेल'

सकाळ डिजिटल टीम

'वेळ अशी आलीये की वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी स्वयंपाक करत बसावं लागेल'

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत भाष्य करताना जीभ घसरली आहे. कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची, अशा शब्दांत त्यांनी टीपण्णी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता महाविकास आघाडीतील महिला नेत्यांकडून टीका होत आहे.

कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. त्या म्हणातात, चंद्रकांत दादा, आता वेळ अशी आलीये की वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी स्वयंपाक करत बसावं लागेल, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांंच्या कान्स संदर्भावरून दिला आहे. काळ बदलला आहे, महिलांना कमी लेखू नका. महिला तुमचं दुकान कधी उखडून टाकतील समजणार ही नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, खासदार सुळे यांनी मध्यप्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं, असा सवाल केंद्र सरकारला विचारणार होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला होता. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असं म्हणत चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा इतका विचार करत नाही असे म्हटले होते.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनीही टोमणा मारला आहे. बाई कष्टते राबते तव्हा भाकर फुगते, माय होऊनी जगाची नाळे वाट जगविते. चंद्रकांत पाटील तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देते. सहकुटुंब अवश्य या, असं चव्हाण म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

El Nino Impact: अल निनोच्या कमी पावसाने रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वरातील भातशेती कोलमडली; ३०-४० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज

DCM Sunetra Pawar : हारतुरे नको...मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा

SCROLL FOR NEXT