Ajit Pawar criticizes political leaders esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : महाराष्ट्रात वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीये; असं कोणाला उद्देशून म्हणाले अजितदादा?

अलीकडे वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हेमंत पवार

आरेला कारे केले जाते. ही शिकवण ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही.

कराड : अलीकडे वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानानं दिला आहे, त्या अधिकाराचा वापर आपण कशाप्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, अलीकडं कोणी काही बोलतो. आरेला कारे केले जाते. ही शिकवण ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, संस्कृती नाही. हे सर्वांनीच ध्यानात घेतलं पाहिजं, असा टोला सर्वच राजकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडात लगावला.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त (Yashwantrao Chavan Death Anniversary) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पर्णकुटीत भजन कार्यक्रमासही हजेरी लावली. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली, असंही पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT